संतापजनक..! झोपलेल्या मजुराच्या चेहऱ्यावर तरुणाने केली लघुशंका, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  संतापजनक..! झोपलेल्या मजुराच्या चेहऱ्यावर तरुणाने केली लघुशंका, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई

संतापजनक..! झोपलेल्या मजुराच्या चेहऱ्यावर तरुणाने केली लघुशंका, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई

Jun 03, 2024 05:29 PM IST

Crime News : झोपलेल्या मजुराच्या चेहऱ्यावर लघवी केल्याचा व्हिडिओ सोमवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या.

झोपलेल्या मजुराच्या चेहऱ्यावर लघवी केल्याचा प्रकाराचे खळबळ
झोपलेल्या मजुराच्या चेहऱ्यावर लघवी केल्याचा प्रकाराचे खळबळ

man urinated on the face : राजधानी लखनऊमध्ये किळसवाणी घटना घडली आहे. येथे मोकळ्या मैदानात झोपलेल्या एका मजुराच्या चेहऱ्यावर एका तरुणाने लघवी केली आहे. हा किळसवाण्या घटनेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकताच हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. मजुराने विरोध केल्यानंतर त्याला बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली होले. 

त्यानंतर मजुराच्या पत्नीने याची पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी लघुशंका करणाऱ्या तरुणाला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, दारूच्या नशेत तरुणाने हे कांड केले आहे. 

झोपलेल्या मजुराच्या चेहऱ्यावर लघवी केल्याचा व्हिडिओ सोमवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. लोकांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. व्हिडिओमध्ये दिसते की, चेहऱ्यावर लघवी करणारा व्यक्ती हसत आहे. त्याच्यासोबत असणारा अन्य एक व्यक्ती त्याला न थांबवता केवळ पाहात उभा आहे. 

पोलीस उपायुक्त दुर्गेश कुमार यांनी सांगितले की, याबाबत एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे तसेच आयपीसीच्या अनेक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी सांगितले की, पीडित मजुराच्या पत्नीने पोलिसात तक्रार दाखल केला आहे. ही घटना रविवारी दुपारी दुबग्गा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोंदिया खेडा येथे घडली. 

डीसीपींनी सांगितले की, गावातील भाजी मार्केटजवळ मोकळ्या मैदानात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये दिसत असलेले दोन व्यक्ती अजय कुमार रावत आणि संजीव उर्फ ​​संजय मौर्य, जे रोजंदारीवर काम करणारे मजूर आहे. ते तेथे काम करत होते. सर्व युवक एकाच गावातील राहणारे आहेत. 

रविवारी दुपारी आपले काम संपल्यानंतर ते दारू पितात. सांगितले जात आहे की, जेव्हा रावत झोपला तेव्हा मौर्य याने रावतच्या चेहऱ्यावर लघवी केली. दुबग्गाचे पोलीस टाणे प्रभारी अभिनव कुमार वर्मा यांनी सांगितले की, अधिक प्रमाणात दारूचे सेवन केल्याने त्याने असे कृत्य केले. यामागे अन्य कोणताच उद्देश्य नाही.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर