Pakistan news : भिकेला लागलेल्या पाकिस्तानला उंदरांमुळे डोकेदुखी! संसदेत सोडणार मांजरी-shahbaz sharif government passes budget to deal with rat menace in pakistan parliament ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Pakistan news : भिकेला लागलेल्या पाकिस्तानला उंदरांमुळे डोकेदुखी! संसदेत सोडणार मांजरी

Pakistan news : भिकेला लागलेल्या पाकिस्तानला उंदरांमुळे डोकेदुखी! संसदेत सोडणार मांजरी

Aug 22, 2024 09:38 AM IST

Pakistan rat issue : पाकिस्तानच्या संसदेत उंदरांनी धुमाकूळ घातला आहे. अनेक महत्वाची कागदपत्र उंदरांनी नष्ट केली आहे तर संगणकाच्या वायरी देखील कुरतडल्या आहे. उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी सरकारने खास बजेट मंजूर केले आहे.

भिकेला लागलेल्या पाकिस्तानला उंदरांमुळे डोकेदुखी! संसदेच्या विशेष अधिवेशनात केली आर्थिक तरतूद
भिकेला लागलेल्या पाकिस्तानला उंदरांमुळे डोकेदुखी! संसदेच्या विशेष अधिवेशनात केली आर्थिक तरतूद

Pakistan rat issue : आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानसाठी आता उंदीर ही नवी डोकेदुखी बनली आहे. पाकिस्तानी संसदेत उंदरांनी मोठा उच्छाद मांडला आहे. उंदरांच्या उच्छादामुळे शाहबाज शरीफ यांचे सरकारला नाकी नऊ आले आहेत. उंदरांनी पाकिस्तानी संसदेतील महत्त्वाची कागदपत्रे खाऊन टाकली आहेत. परिस्थिती हाताळण्यासाठी आणि संसद भवनात उंदरांचा त्रास कमी करण्यासाठी पाक प्रशासनाने संसद आवारात मांजरी सोडण्याचा आणि सापळे लावण्याचा निर्णय घेतला आहे. या साठी त्यांनी १२ लाख पाकिस्तानी रुपयांचे विशेष बजेट मंजूर केले आहे.

अरब न्यूजच्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या संसदेत उंदरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. उंदरांनी अनेक महत्त्वाची आणि गोपनीय कागदपत्रे कुरताडून नष्ट केली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये नॅशनल असेंब्ली आणि सिनेट यांना समान दर्जा आहे. उंदीर केवळ कागदपत्रेच नाही तर संगणकाच्या केबललही कुरतडून ठेवत आहेत. अशा परिस्थितीत संसद भवनात भक्षक मांजरी सोडण्याबरोबरच उंदीर पकडण्यासाठी सापळे देखील लावले जाणार आहे. यासाठी खासगी संस्थांचीही मदत घेतली जाणार आहे.

एका सरकारी समितीने २००८ सालातील काही जुनी कागदपत्र शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा ही समस्या समोर आली. समितीने कागदपत्रे पाहिली असता बहुतांश कागदपत्रांचा भुगा उंदरांनी केल्याचं दिसून आलं. संसद भवनाच्या दुसऱ्या मजल्यावर उंदरांची संख्या सर्वाधिक आहे. या दुसऱ्या मजल्यावर विरोधी पक्षनेत्याचे कार्यालय आहे; दिवसा लोकांची गर्दी जास्त असल्याने उंदीर या ठिकाणी क्वचितच वावरत असले तरी रात्री संसदेत उंदराचं विशेष सत्र चालतं.

संसदेत दिवसा सदस्यांचे आणि रात्री उंदरांचे विशेष सत्र

अरब न्यूजनुसार, पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीचे प्रवक्ते जफर सुलतान म्हणाले की, संसद भवनातील उंदरांचा आकार इतका मोठा आहे की ते मांजरही गिळू शकतात. नॅशनल असेंब्लीच्या एका अधिकाऱ्याच्या शब्दात सांगायचे तर, "संध्याकाळनंतर माणसे नसतात तेव्हा उंदीर मॅरेथॉन धावत असल्यासारखं वाटतं. इथल्या कामगारांना याची सवय झाली आहे. पण जेव्हा कोणी पहिल्यांदा येतो तेव्हा तो या उदरांना पाहून घाबरून जातो .

सोशल मिडियावर व्हायरल

आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानच्या संसदेत उंदरांचा प्रश्न सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पाकिस्तानातील लोकांचे म्हणणे आहे की, देशात सत्ताधारी आणि लष्करामध्ये नेहमीच उंदीर -मांजराचे युद्ध सुरू असते. ती लढत यावेळी संसदेत पाहायला मिळतीये ही भाग्याची गोष्ट आहे.