कंगना पुन्हा बरळली! म्हणाली, भिंद्रनवालेने खलिस्तानची मागणी कधीच केली नाही; एसजीपीसीने पाठवली नोटिस-sgpc legal notice seeks removal of anti sikh scenes from kangana starrer emergency ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  कंगना पुन्हा बरळली! म्हणाली, भिंद्रनवालेने खलिस्तानची मागणी कधीच केली नाही; एसजीपीसीने पाठवली नोटिस

कंगना पुन्हा बरळली! म्हणाली, भिंद्रनवालेने खलिस्तानची मागणी कधीच केली नाही; एसजीपीसीने पाठवली नोटिस

Aug 28, 2024 10:15 AM IST

kangana ranaut statement : एसजीपीसीचे कायदेशीर सल्लागार अधिवक्ता अमनबीर सिंग सियाली यांनी पाठवलेल्या नोटीसमध्ये चित्रपट निर्मात्यांना चित्रपटातून शीखविरोधी भावना दर्शवणारी दृश्ये काढून टाकण्यास सांगितले आहे.

कंगना पुन्हा बरळली! म्हणाली, भिंद्रनवालेने खलिस्तानची मागणी कधीच केली नाही; एसजीपीसीने पाठवली नोटिस
कंगना पुन्हा बरळली! म्हणाली, भिंद्रनवालेने खलिस्तानची मागणी कधीच केली नाही; एसजीपीसीने पाठवली नोटिस

kangana ranaut statement : शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने (SGPC) मंगळवारी अभिनेत्री व खासदार कंगना राणौतच्या आगामी 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. चित्रपटातून शिखांची बदनामी केल्या प्रकरणी व चुकीच्या पद्धतीने इतिहासाची मांडणी केल्या प्रकरणी त्यांनी नोटिस पाठवली आहे. कंगनाने कट्टरपंथी शीख धर्मोपदेशक जर्नेल सिंग भिंद्रनवाले व शीख समुदायातील इतर कोणत्याही व्यक्तीने कधीही खलिस्तानची मागणी केलेली नाही, असं देखील वक्तव्य केलं आहे. इमर्जन्सी हा चित्रपट माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर व १९७५ मध्ये भारतात आणीबाणी लागू करण्यात आली होती, त्यावर आधारित हा चित्रपट आहे.

कंगना रणौतने चरित्रपटात इंदिरा गांधींची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांमध्ये तिचा देखील समावेश आहे. चित्रपटाचा ट्रेलर १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट ६ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. एसजीपीसीचे कायदेशीर सल्लागार अधिवक्ता अमनबीर सिंग सियाली यांनी पाठवलेल्या नोटीसमध्ये चित्रपट निर्मात्यांना चित्रपटातून शीखविरोधी भावना दर्शवणारी दृश्ये काढून टाकण्यास सांगितले आहे. सार्वजनिक आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून चित्रपटाचा ट्रेलर काढून टाकण्यात यावा व शीख समुदायाची लेखी माफी मागण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

एसजीपीसीने दिलेल्या नोटीसीत म्हटले आहे की, या चित्रपटात दाखवण्यात आलेले काही दृश्य ही चुकीची आहेत. शीख पोशाखातील काही नागरिक लोकांवर गोळीबार करताना दाखवले आहेत. नोटीसमध्ये म्हटले आहे की, भिंद्रनवाले यांनी असे शब्द कधी कोणाला सांगितले हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा किंवा रेकॉर्ड नाही. एसजीपीसीने नोटीसमध्ये म्हटले आहे की, हा चित्रपट शीखांच्या भावना दुखावण्याचे व शीख धर्माबद्दल चुकीची माहिती देणारा आहे. या चित्रपटात शीख धर्माच्या इतिहासातील काळ्या दिवसांचे चित्रण करण्यात आल्याचं देखील नोटीसमध्ये म्हटलं आहे.

शेतकऱ्यांबाबतच्या वक्तव्यावरुन गदारोळ

या पूर्वी कंगनाने शेतकरीविरोधी वक्तव्य केले होते. यावरून मोठा गदारोळ झाला होता. कंगनाच्या शेतकरी आंदोलनासंदर्भातील वादग्रस्त वक्तव्यावरून आम आदमी पक्षाने हरियाणातील अनेक शहरांमध्ये निदर्शने केली, तर काँग्रेसने देखील कंगनाच्या व्यक्तव्यावरून टीका केली आहे. हिमाचल प्रदेशचे पीडब्ल्यूडी मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी कंगनाच्या या वक्तव्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. ते म्हणाले, कंगनाने दिलेले विधान तिची बौद्धिक दिवाळखोरी दाखवते. सिंह म्हणाले, कंगनाने शेतकऱ्यांविरोधात वक्तव्ये केली असून शेतकरी आंदोलनात चीन आणि अमेरिकेचा हात असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. हे दुर्दैवी आहे.

३१ ऑगस्टला शेतकऱ्यांचे देशव्यापी आंदोलन

शेतकरी नेते सर्वन सिंह पंढेर यांनी कंगना राणौतला तिच्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागायला सांगितली आहे. कंगनाने केलेल्या विधानापासून पळणे भाजपला योग्य ठरणार नाही. भाजपने कंगनावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. तसेच तिच्या वक्तव्याच्या निषेधार्थ ३१ ऑगस्टला देशव्यापी आंदोलन करणार असल्याचे पंढेर म्हणाले.

 

विभाग