दोन विद्यार्थ्यांना बनवले वासनेची शिकार; शिक्षिकेला भोगावा लागतोय तुरुंगवास
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  दोन विद्यार्थ्यांना बनवले वासनेची शिकार; शिक्षिकेला भोगावा लागतोय तुरुंगवास

दोन विद्यार्थ्यांना बनवले वासनेची शिकार; शिक्षिकेला भोगावा लागतोय तुरुंगवास

Published Mar 04, 2025 04:56 PM IST

एका विद्यार्थ्याशी अयोग्य संबंध ठेवल्याप्रकरणी आधीच अटक करण्यात आलेल्या स्पीयर्सला आता अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली पुन्हा तुरुंगात डांबण्यात आले आहे.

शिक्षिका मॉली कोलीन स्पीयर्स
शिक्षिका मॉली कोलीन स्पीयर्स

टेक्सासमधील हायस्कूलच्या माजी शिक्षिका मॉली कोलीन स्पीयर्स सध्या तुरुंगात आहेत. स्पीयर्स (३५) यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप ठेवण्यात आला आहे. एका विद्यार्थ्यांशी अयोग्य संबंध ठेवल्याप्रकरणी आधीच अटक करण्यात आलेल्या स्पीयर्सला आता अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली पुन्हा तुरुंगात डांबण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे नवे प्रकरण त्याच घटनेशी संबंधित आहे ज्यामध्ये तीन आठवड्यांपूर्वी शिक्षिकेला अटक करण्यात आली होती. स्पीयर्सला गुरुवारी चेंबर्स काउंटी तुरुंगात हलवण्यात आले, जिथे आता तिला दोन लाख डॉलरच्या बदल्यात जामिनावर सोडण्यात येणार आहे.

न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, कोर्टाच्या कागदपत्रांनुसार, स्पीयर्सवर पहिल्यांदा 8 फेब्रुवारी रोजी आरोप ठेवण्यात आले होते, जेव्हा तिने 12 जून 2023 रोजी बार्बर्स हिल हायस्कूलमधील एका विद्यार्थ्याशी लैंगिक संबंध ठेवल्याचे उघड झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षिकेने विद्यार्थ्याला टेक्स्ट मेसेजद्वारे भेटण्याची योजना आखली होती. ११ फेब्रुवारी रोजी तिने पोलिसांसमोर शरणागती पत्करली, पण ५० हजार डॉलरच्या बदल्यात तिची जामिनावर सुटका झाली. आता नव्या आरोपांची भर पडल्याने त्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

दोन-दोन विद्यार्थ्यांसोबत बनवले संबंध -

बार्बर्स हिल इंडिपेंडेंट स्कूल डिस्ट्रिक्टने पुष्टी केली की स्पीयर्स ऑगस्ट २०२१ ते जून २०२३ पर्यंत शाळेत शिकवित होती. नंतर अचानक राजीनामा दिला. मात्र, त्याला तात्काळ अटक का करण्यात आली नाही, हे समजू शकलेले नाही. शाळा प्रशासनाने याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नसून अंतर्गत चौकशीशी संबंधित तपशील सामायिक करता येणार नसल्याचे सांगितले.

होऊ शकतो २० वर्षाची शिक्षा -

शिक्षिकेचे वकील ख्रिस्तोफर एल. ट्रिटिको यांनी सांगितले की, स्पीयर्स यांना दोन दिवसांपूर्वी नवीन आरोपांची माहिती देण्यात आली होती. आम्ही तात्काळ जामीन प्रक्रिया सुरू केली. मिस स्पीयर्स ला आशा आहे की लवकरच या आरोपांना न्यायालयात सामोरे जावे लागेल आणि खटला संपेल. तथापि, टेक्सास एज्युकेशन एजन्सीच्या नोंदीनुसार, सप्टेंबर २०२४ पासून त्यांचे शिक्षक प्रमाणपत्र निष्क्रिय करण्यात आले आणि त्यांना शिकवण्यास मनाई आहे. स्पीयर्स दोषी आढळल्यास त्याला २० वर्षांचा तुरुंगवास आणि १०,००० डॉलरपर्यंत दंड होऊ शकतो.

Shrikant Ashok Londhe

TwittereMail

श्रीकांत लोंढे हिंदुस्तान टाइम्स-मराठी मध्ये चीफ कन्टेन्ट प्रोड्यूसर आहे. प्रादेशिक, राष्ट्रीय, राजकीय व गुन्हेविषयक बातम्या कव्हर करतो. प्रिंट आणि डिजिटलमध्ये एकूण १४ वर्षांचा अनुभव. यापूर्वी दैनिक लोकमत, लोकमत समाचार, ईनाडू न्यूज, ईटीव्ही-भारत मध्ये रिपोर्टिग आणि डेस्कवरील कामाचा अनुभव. विशेष स्टोरीज, क्रीडा, राजकारण, मनोरंजन तसेच बिझनेसच्या बातम्याही कव्हर करतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर