chhattisgarh bemetara accident : एका कौटुंबिक कार्यक्रमाला जात असणाऱ्या एका कुटुंबातील काही सदस्यांवर काळाने घाला घातला आहे. छत्तीसगडमधील बेमतारा येथे एक पीक आणि बसचा भीषण अपघात झाला असून या अपघातात १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतांमध्ये तीन निष्पाप मुलांचाही समावेश आहे. तर २४हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे. त्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले आहे.
छत्तीसगडमधील बेमतारा येथे एक भीषण अपघात झाला आहे. येथे भीषण रस्ते अपघातात १० जण ठार झाले आहे. मृत सर्व एकाच कुटुंबातील असून ते हे सर्व जण एका कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होऊन परतत येत असतांना हा भीषण अपघात झाला आहे.
ही घटना बेमताराय पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काठिया पेट्रोल पंपाजवळ आज सकाळी घडली. मृत सर्व जण हे कौटुंबिक कार्यक्रमासाठी तिरैया येथे गेले होते. येथील कार्यक्रम संपवून ते पाथऱ्याला परत येत होते. यावेळी त्यांच्या बसला पिकअपची धडक बसली. ही धडक इतकी जोरदार होती की, १० जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच येथील पोलीस आणि प्रशासनाचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले.
पोलिसांनी मदत आणि बचाव कार्य सुरू करून जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. सुमारे दोन डझन लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. बेमतराचे जिल्हाधिकारी रणवीर शर्मा, एसपी रामकृष्ण साहू आणि सर्व वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात पोहोचले आहे. जखमींवर तातडीने उपचार करण्यात येत आहेत. यातील काही नागरिक गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या