नदीवर अंघोळीसाठी गेलेल्या सात तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा-seven youths drowned in banganga river of bharatpur rajasthan ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  नदीवर अंघोळीसाठी गेलेल्या सात तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा

नदीवर अंघोळीसाठी गेलेल्या सात तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा

Aug 11, 2024 08:17 PM IST

Rajasthan News : भरतपूरजवळ बाणगंगा नदीच्या किनारी तलावाची भिंत कोसळल्याने त्यावर उभे असलेले ८ तरुण नदीच्या प्रवाहात वाहून गेले. त्यातील ७ तरुणांचा मृत्यू झाला आहे.

सात तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू
सात तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू

Rain Alert : राजस्थानमधील भरतपूरमधून मोठी बातमी समोर आली आहे. येथील बाणगंगा  नदीत अंघोळीसाठी गेलेल्या एकाच गावातील ८ तरुणांपैकी ७ तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. सर्व तरुण जिल्ह्यातील बयाना पोलीस ठाणे क्षेत्रातील श्रीनगर गावातील रहिवासी होते. रविवारी सकाळी सर्वजण अंघोळीसाठी बाणगंगा नदीत (Banganga River) गेले होते. यावेळी सात तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर एकाचा जीव वाचवण्यात यश आले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी नदीच्या पात्रात बेपत्ता तरुणांचा शोध घेतला. एका तासाच्या शोध मोहिमेत सर्व ७ तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. 

मिळालेल्या माहितीनुसार सर्व मृत तरुणांचे वय १८ ते २२ वर्षाच्या दरम्यान आहे. ग्रामस्थांनी एक तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर सर्व मृतदेह बाहेर काढले. झील चौकीचे हेड कान्स्टेबल धर्मवीर यांनी सांगितले की, पवन (१५), सौरभ सिंह (१६), भूपेंद्र (१८), शांतनु (१८), लक्खी (२०), गौरव (१६) आणि पवन (२२) यांचा मृत्यू झाला आहे. सर्वांचे मृतदेह नदीतून बाहेर काढले आहेत. सूखी नदीच्या पात्रातून जेसीबीने माती काढल्यामुळे खोल खड्डा पडला होता. भिंत कोसळल्यामुळे सर्व तरुण पाहण्यातून वाहून जात त्या खड्ड्यात बुडाले.

गेल्या काही दिवसांपासून राजस्थानमध्ये मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील सर्व नदी-नाल्यांना पूर आला असून अनेक दुर्घटनाही घडत आहेत. भरतपूर जिल्ह्यातील नंगला गावात पावसामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. पावसामुळे नदी जवळच्या तलावात पाणी साचले होते. वैनगंगा नदी आणि तलावाच्या मध्ये असणाऱ्या भिंतीवर उभं राहून हे तरुण सोशल मीडिया रील बनवत असल्याची माहिती आहे. 

आठ तरुण तलावात उतरले होते. ती सर्व मुलं तलावाच्या भिंतीच्या शेजारी उभं राहून रील तयार करत होती. त्याचवेळी पावसामुळे भिंत कोसळली, मुलं तलावात वाहून गेली. वैनगंगा नदी आधीच काठोकाठ भरुन वाहत होती. त्यामध्ये मुलांचा मृत्यू झाला. रील तयार करण्यासाठी ही मुले तलावाच्या भिंतीजवळ उभे होते, त्यावेळी अचानक ती भिंत कोसळली. त्यामुळे पाण्यात वाहून जाऊन सात मुलांचा मृत्यू झाला. 

बाणगंगा नदीला लागून असलेल्या तलावाच्या भिंतीवर सर्व तरुण उभे राहून व्हिडिओ शूट करत होते. अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि भिंत कोसळली. भिंत कोसळताच ८ मुले पाण्यात बुडाली. मात्र यातील एक तरुण सुदैवाने तलावाच्या कडेला असलेल्या झुडपात अडकला, व कसाबसा बचावला. त्यानंतर त्याने घरी येऊन सर्व प्रकाश लोकांना सांगितला. माहिती मिळताच गावकऱ्यांनी तलावाकडे धाव घेत त्यांचा शोध घेतला मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती व सात मुलांचा बुडून मृत्यू झाला होता.

विभाग