Whatsapp News: सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपच्या युजर्सना इशारा दिला आहे. ख्रिसमसपूर्वी मेसेजिंग अॅप्स वापरणाऱ्या युजर्सना टार्गेट केले जात असून सायबर गुन्हेगार सक्रीय झाल्याचे समोर आले आहे. दररोज लाखो युजर्स अकाऊंट हॅक होत असल्याच्या तक्रारी करत आहेत. याचपार्श्वभूमीवर व्हॉट्सअॅप युजर्सनी कोणती काळजी घ्यावी, याबाबत जाणून घेऊयात.
व्हॉट्सअॅप युजर्सना स्क्रीनवर सहा अंकी कोड दाखवून अकाऊंट शेअर करण्याचा पर्याय दिला जात असून सायबर गुन्हेगारही त्याचा फायदा घेतात. एखाद्या अकाऊंटवर सिक्युरिटी फीचर्स व्यवस्थित इनेबल न केल्यास या फीचरने अकाऊंट हायजॅक केले जाते. जर तुम्हाला तुमच्या चॅट आणि अकाऊंटचा अॅक्सेस गमावायचा नसेल तर तुम्ही ताबडतोब तीन महत्त्वाचे बदल करावेत.
व्हॉट्सअॅपमध्ये एक्स्ट्रा सिक्युरिटी लेयर, टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन किंवा टू-स्टेप व्हेरिफिकेशन फीचर आहे. सेटिंग्जच्या अकाउंट सेक्शनमध्ये तुम्हाला हा पर्याय मिळू शकतो. हे वापरकर्त्याला एक कोड पाठवते, जे खाते अॅक्सेस करण्यासाठी प्रथम प्रविष्ट करावे लागते.
मेटाच्या मालकीच्या अॅपमध्ये युजर्सला ईमेल अपडेट करण्याचा पर्याय मिळतो, ज्यामुळे हॅकिंग किंवा इतर परिस्थितीत अकाऊंट अॅक्सेस करणे सोपे जाते. खाते पुनर्प्राप्तीसाठी ईमेल अपडेट करणे आवश्यक आहे आणि सेटिंग्जच्या खाते विभागात जाऊन ईमेल अपडेट केला जाऊ शकतो.
अॅप अॅक्सेस करण्यासाठी युजर्सला बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन किंवा पास-की सारखे पर्याय मिळतात. त्याचप्रमाणे तुम्हाला हवं असेल तर फिजिकल की वापरू शकता, जे कनेक्ट केल्याशिवाय व्हॉट्सअॅप अकाऊंट अॅक्सेस करू शकणार नाही. आपण ही फिजिकल की ऑनलाइन ऑर्डर करू शकता.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, व्हॉट्सअॅपचा ६ अंकी कोड कोणालाही शेअर करू नये. याची विशेष काळजी घ्यायला हवी.
संबंधित बातम्या