मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  UPI Down Today : ‘फोन पे-गुगल पे’ वर पेमेंट होत नसल्यानं लोक वैतागले, सोशल मीडियावर संतापाची लाट

UPI Down Today : ‘फोन पे-गुगल पे’ वर पेमेंट होत नसल्यानं लोक वैतागले, सोशल मीडियावर संतापाची लाट

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 01, 2023 06:28 AM IST

UPI Down Today : फोन पे आणि गुगल पे या पेमेंट्स अॅपची सेवा मध्यरात्रीपासून अचानक ठप्प झाली आहे. त्यामुळं पेमेंट होत नसल्यामुळं अनेक युजर्सनी नाराजी व्यक्त केली आहे.

UPI Transaction Issue Today
UPI Transaction Issue Today (HT)

UPI Transaction Issue Today : भारतासह जगभरात नववर्षाचं स्वागत केलं जात असतानाच मध्यरात्रीपासून गुगल पे आणि फोन पे ची सेवा अचानक ठप्प झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळं नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सिलेब्रेशनच्या मूडमध्ये असलेल्या लोकांना अचानक संताप आणणाऱ्या या बातमीमुळं लोक हैराण झाले आहेत. या प्लॅटफॉर्मवरून अनेकांचे व्यवहार होत नाहीये. मध्यरात्रीपासून पेमेंट करण्यात अडचणी येत असल्यानं युजर्सनी ट्वीटरवर आपली नाराजी व्यक्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यूपीआय सर्व्हर डाऊन झाल्यानंतर असंख्य लोकांनी फोन पे आणि गुगल पे कंपनीला टॅग करत तक्रारी करायला सुरुवात केली. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी हा मनस्ताप कशासाठी, असा सवाल वापरकर्त्यांनी दोन्ही कंपन्यांना विचारला आहे. फक्त भारतातूनच नाही तर विदेशातूनही अनेक लोक फोन पे आणि गुगल पे चालत नसल्याची तक्रार ट्वीटरवर करत असल्यानं आता पेमेंट्सची सेवा पूर्ववत करण्याच्या मागणीनं जोर धरला आहे.

यूपीआय ही ही रिअल-टाइम पेमेंट सिस्टम आहे. भारतातील तब्बल ६० टक्के किरकोळ व्यवहार यूपीआयद्वारे होत आहेत. कमी काळात अगदी लहान किंवा मोठ्या रकमेचा व्यवहारही या प्लॅटफॉर्मवरून करता येतो. त्यामुळं आता नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी फोन पे आणि गुगल पे ची सेवा ठप्प झाल्यानं युजर्सला मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. नेमकं काय झालंय, किंवा सेवा कधीपर्यंत पुन्हा सुरू करण्यात येईल, याबाबत दोन्ही कंपन्यांकडून अद्याप स्पष्टीकरण आलेलं नाही.

IPL_Entry_Point