मागच्या वर्षी सीमा हैदर-सचिन मीनाची लव स्टोरी भारतासह पाकिस्तानमध्ये चांगलीच गाजली होती. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सीमा हैदरने एक गुड न्यूज दिली आहे. सीमा हैदरने सांगितले की, ती सचिनच्या मुलाच्या आई बनणार आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखातीत सीमा हैदरने म्हटले की, ती या वर्षात आई बनणार आहे. होळीपर्यंत ती आई होणार का, या प्रश्नावर सीमा म्हणाली की, इतक्या लवकर नाही मात्र मला सचिनपासून मूल होणार आहे.
सचिनच्या वडिलांनीही सीमा हैदर गर्भवती असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सचिनच्या वडिलांनी सांगितले की, मी सूनेचा हात पाहिला आहे. तिला मुलगाच होणार आहे. मी ज्या महिलेचा हात पाहतो, ते कधी खोटे ठरत नाही.
पब्जी खेळताना सचिन व पाकिस्तानी महिला सीमा हैदर यांच्यात प्रेम झाले. मागच्या वर्षी सीमा हैदर आपल्या मुलांसह पाकमधून नेपाळला गेली होती. त्यानंतर भारतात आली होती. सचिन व सीमाने एका मंदिरात लग्न केले होते. सीमा हैदरवर पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय एजेंट होण्याचा रोप झाला होता. मात्र सर्व चौकशा केल्यानंतर तिला क्लीनचिट दिली होती.
सीमा हैदरला तिचा पहिला पती गुलाम हैदर पासून चार मुले आहेत. ती सर्व सीमाजवळ आहेत. फरहान अली, फरवा, फरीहा बतूल, फरहा बटूल अशी सीमाला चार मुलं आहेत. भारतात आल्यानंतर सीमाने तिच्या मुलांची नावे बदलली आहेत. सीमा हैदर या पाकिस्तानी महिलेने तिच्या चार मुलांसह भारत गाठले आहे. उत्तर प्रदेशातील नोएडा येथे राहणाऱ्या सचिनच्या प्रेमात ती पडली. सचिनसोबत नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी ती नेपाळमार्गे अवैधरित्या भारतात आली. मात्र, या लव्हस्टोरीमुळं संपूर्ण देशात खळबळ उडाली.