sebi recruitment 2024 : सेबीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती? जाणून घ्या सर्व माहिती
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  sebi recruitment 2024 : सेबीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती? जाणून घ्या सर्व माहिती

sebi recruitment 2024 : सेबीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती? जाणून घ्या सर्व माहिती

Updated Jun 15, 2024 02:31 PM IST

सेबी असिस्टंट मॅनेजर पदांसाठी भरती करणार आहे. पात्र उमेदवार sebi.gov.in येथे अर्ज करू शकतात.

सेबीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती? जाणून घ्या सर्व माहिती
सेबीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती? जाणून घ्या सर्व माहिती

SEBI Assistant Manager Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी चालून आली आहे. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात, सेबीनं असिस्टंट मॅनेजर पदांसाठी अर्ज मागवले आहेत.

sebi.gov.in या सेबीच्या अधिकृत वेबसाइटद्वारे नोकरीसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. या भरती मोहिमेत अंतर्गत सेबीमध्ये ऑफिसर ग्रेड ए स्तरावरील ९७ पदं भरण्यात येणार आहेत.

या भरती प्रक्रियेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना महिन्याला १,४९,५०० इतका भरघोस पगार मिळणार आहे. निवड झालेल्या उमेदवाराची पोस्टिंग देशात कुठेही होऊ शकते.

अर्ज नोंदणी प्रक्रिया ११ जूनपासून सुरू झाली असून ३० जून २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. पात्रता, निवड प्रक्रिया आणि इतर तपशील खालीलप्रमाणे…

या तारखा नीट लक्षात ठेवा!

  • अर्ज करण्याची पहिली तारीख : ११ जून २०२४
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० जून २०२४
  • टप्पा १ ऑनलाइन परीक्षा : २७ जुलै २०२४
  • टप्पा २ ऑनलाइन परीक्षा: ३१ ऑगस्ट २०२४
  • माहिती तंत्रज्ञान शाखेच्या दुसऱ्या टप्प्यातील पेपर २ : १४ सप्टेंबर २०२४

हेही वाचा: पैसे तयार ठेवा! ह्युंडई कंपनी आणतेय देशातील सर्वात मोठा आयपीओ, एलआयसीचा विक्रम मोडणार

एकूण जागा

  • सर्वसाधारण वर्ग : ६२ जागा
  • कायदेशीर : ५ पदे
  • माहिती तंत्रज्ञान : २४ पदे
  • संशोधन : २ पदे
  • राजभाषा : २ पदे
  • अभियांत्रिकी : २ पदे

पात्रता निकष

निवडीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा इथं तपासा!

निवड प्रक्रिया

निवड प्रक्रिया तीन टप्प्यांत राबवली जाईल. त्यातील पहिला टप्पा (प्रत्येकी १०० गुणांचे दोन पेपर असलेली ऑनलाइन स्क्रीनिंग परीक्षा), दुसरा टप्पा (प्रत्येकी १०० गुणांचे दोन पेपर असलेली ऑनलाइन परीक्षा) आणि तिसरा टप्पा (मुलाखत) असा असेल.

अर्ज शुल्क

  • अनारक्षित/ओबीसी/ईडब्ल्यूएस : १०००/- रुपये अर्ज शुल्क सह सूचना शुल्क + १८% जीएसटी
  • एससी/एसटी/पीडब्ल्यूबीडी : १००/- रुपये सूचना शुल्क + १८% जीएसटी

संबंधित भरती विषयी अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवार sebi.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर