Viral Video: 'या' देशात नवरदेव आणि नवरीच्या अंगावर फेकतात चिखल आणि सडलेल्या भाज्या, पाहा व्हिडिओ!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: 'या' देशात नवरदेव आणि नवरीच्या अंगावर फेकतात चिखल आणि सडलेल्या भाज्या, पाहा व्हिडिओ!

Viral Video: 'या' देशात नवरदेव आणि नवरीच्या अंगावर फेकतात चिखल आणि सडलेल्या भाज्या, पाहा व्हिडिओ!

Dec 10, 2024 02:31 PM IST

Scotland Wedding Traditions: ‘या’ देशात लग्नाच्या दिवशी नवरदेव आणि नवरीच्या अंगावर चिखल आणि सडलेल्या भाज्या फेकल्या जातात.

'या' देशात नवरदेव आणि नवरीच्या अंगावर फेकतात चिखल आणि सडलेल्या भाज्या
'या' देशात नवरदेव आणि नवरीच्या अंगावर फेकतात चिखल आणि सडलेल्या भाज्या

Scotland Wedding Traditions News: सध्या लग्नसराईचा हंगाम आहे, सर्वत्र सनईचे सूर ऐकू येत आहेत. प्रत्येक देशात आणि जाती आणि धर्मात लग्नाच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत. काही देशात अशा विचित्र परंपरा आहेत, त्यांच्याबद्दल ऐकून लोकांना आश्चर्य वाटेल. आज आपण स्कॉटलँडमधील लग्नाच्या अशाच काही विचित्र प्रथेबद्दल जाणून घेणार आहोत. स्कॉटलँडमध्ये नवरदेव आणि नवरीच्या अंगावर चक्क चिखल आणि सडलेल्या भाज्या फेकल्या जातात, हे ऐकल्यानंतर अनेकजण हैराण झाले आहेत.

लग्न हे प्रत्येक मुलगा आणि मुलीसाठी खास असते. आपल्या लग्नात सर्वात सुंदर दिसण्यासाठी ते छान मेकअप करून स्वतःला तयार करतात. पण लग्नाच्या दिवशी कोणी तुमच्या अंगावर सडलेले टोमॅटो, भाड्या आणि अंडी टाकले तर तुम्हाला कसे वाटेल, याची कल्पना करा. साहजिकच तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. पण स्कॉटलंडमध्ये लग्नाच्या दिवशी नवरदेव आणि नवरीला झाडाला बांधून त्यांच्यावर चिखल, सडलेल्या भाड्या आणि अंडी फेकली जातात, अशी प्रथा आहे.

नवरदेव- नवरीला काळे फासण्याची परंपरा

स्कॉटलंडमध्ये लग्नाशी संबंधित आणखी एक विचित्र प्रथा आहे, जी ऐकून प्रत्येकजण आश्चर्यचकित होतील. वास्तविक, हे स्कॉटलंडच्या उत्तर-पश्चिम भागाशी संबंधित आहे. काही ग्रामीण भागात वधू- वरांना काळे फासण्याची परंपरा आहे. या प्रथेला ब्लॅकनिंग द ब्राइड असेही नाव आहे.

या प्रथेमागचे कारण काय?

आता सगळ्या प्रथांमागे काही ना काही कारण आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, या विचित्र प्रथेमागे काय कारण आहे? यामागचे कारण असे सांगितले जाते की, असे केल्याने वधू-वर वाईट शक्तींपासून सुरक्षित राहतात. जे लोक या प्रथेदरम्यान स्वतःवर नियंत्रण ठेवतात त्यांना भविष्यातील सर्व समस्यांना तोंड देण्याचे ताकद मिळते आणि त्यांचे वैवाहिक जीवन चांगले जाते, असे म्हटले जाते. या प्रथेमुळे नवविवाहित जोडप्याचे वाईट नजरेपासून संरक्षण होईल.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर