Moon drifting away from earth : चंद्र हजारो वर्षापासून पृथ्वीच्या वरती अवकाशात उपस्थित आहे. अनेक दशकांपासून आपण कथांमध्ये व चित्रपटांमध्ये चंदोबा मामाचे अनेक किस्से ऐकत आलो आहोत. चंद्र केवळ आपल्या पृथ्वीचा एक उपग्रह नाही, तर आमचे चंद्रासोबत भावनिक नातेही आहे. शास्त्रज्ञांनी आता चंद्राबाबत भीती वाटावी अशी बातमी दिली आहे. एका रिसर्चनुसार चंद्र आपल्या पृथ्वीपासून सतत दूर जात आहे. भविष्यात याचे अनेक दुष्परिणाम पाहायला मिळू शकतात. ही घटना येणाऱ्या काळाला बदलू शकते. वैज्ञानिकांनी असेही सांगितले की, चंद्र प्रत्येक वर्षी ३.८ सेमी अंतर पृथ्वीपासून दूर जात आहे.
विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठाच्या एका टीमने ९० मिलियन वर्ष जुन्या चंद्राबाबत एक मोठा इशारा दिला आहे. रिसर्चमध्ये सांगितले की, चंद्र पृथ्वीपासून जवळपास ३.८ सेंटीमीटर प्रति वर्ष दूर जात आहे. याचा परिणाम आपला ग्रह पृथ्वीवरही पडू शकतो. याचा परिणाम असा होईल की, २०० दशलक्ष वर्षात पृथ्वीवर २५ तासांचा दिवस असेल. अभ्यासातून समजते की, १.४ बिलियन वर्षाआधी पृथ्वीवर एक दिवस १८ तासाचा होता. मात्र चंद्र पृथ्वीपासून सतत दूर जात असल्यामुळे दिवसाचा वेळ वाढत गेला.
या घटनेचे मुख्य कारण पृथ्वी आणि चंद्रादरम्यान गुरुत्वाकर्षण आणि दोन्ही ग्रहावार के भरती-ओहोटीच्या शक्तीशी संबंधित आहे. विद्यापीठात भूविज्ञानचे प्रोफेसर स्टीफन मेयर्स यांनी म्हटले की, चंद्र जसजसा दूर जात आहे, तसे पृथ्वीची गती मंदावत आहे.
दरम्यान चंद्र पृथ्वीपासून दूर जात असलेले संशोधन नवीन नाही. यापूर्वीही असे दावे करण्यात आले आहेत. मात्र विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठाने उल्कापिंड आणि चंद्राचा अभ्यास करून पुराव्यांच्या आधारे हा निष्कर्ष काढला आहे. त्यांनी म्हटले आहे की, चंद्र दरवर्षी पृथ्वीपासून दूर जात आहे. चंद्र आणि पृथ्वीवर वेळेची आपआपली गती आहे. चंद्रावर एक दिवस पृथ्वीच्या १४ दिवसांच्या बरोबर आहे. त्याचबरोबर चंद्रावर दिवसा खूप तापमान असते आणि रात्रीच्या वेळी तितकीच थंडी असते. चंद्राच्या दक्षिण ध्रुवासह अंधाऱ्या ठिकाणी रात्रीचे तापमान उणे २०० डिग्रीपर्यंत जाते. तर दिवसाचे तापमान १०० डिग्रीच्या वरती राहते.
संबंधित बातम्या