अरेरे.. गुरुजी तुम्हीही! एका शिक्षिकेवर प्राचार्य आणि शिक्षक दोघांचा जीव जडला, प्रेमाच्या त्रिकोणात एकाचा गेला बळी
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  अरेरे.. गुरुजी तुम्हीही! एका शिक्षिकेवर प्राचार्य आणि शिक्षक दोघांचा जीव जडला, प्रेमाच्या त्रिकोणात एकाचा गेला बळी

अरेरे.. गुरुजी तुम्हीही! एका शिक्षिकेवर प्राचार्य आणि शिक्षक दोघांचा जीव जडला, प्रेमाच्या त्रिकोणात एकाचा गेला बळी

Published Mar 26, 2025 06:28 PM IST

२८ जानेवारी रोजी दरभंगा जिल्ह्यातील कुशेश्वरस्थान येथील शिक्षक रामाश्रय यादव यांची प्रेम त्रिकोणातून हत्या करण्यात आली होती. शाळेतील एका महिला शिक्षिकेसोबत शिक्षक आणि मुख्याध्यापक दोघांचेही प्रेमसंबंध होते. मुख्याध्यापकांनी शिक्षकाला जीवे मारण्याची सुपारी देऊन त्याची हत्या केली.

प्रेमप्रकरणातून शिक्षकाची हत्या
प्रेमप्रकरणातून शिक्षकाची हत्या (AI Generated)

बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत शिकवणाऱ्या महिलेवर मुख्याध्यापक आणि शिक्षक दोघेही प्रेमात पडले. प्रेमाच्या या त्रिकोणात शिक्षक रामाश्रय यादव यांची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील कुशेश्वर स्थान येथे जानेवारी महिन्यात ही हत्या झाली होती. घटनेच्या ५५ दिवसांनंतर पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणला तेव्हा आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या. पोलिसांनी मुख्याध्यापकांसह सात जणांना खुनाच्या आरोपाखाली अटक केली असून त्यात तीन हल्लेखोरांचा समावेश आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष चंद्र चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अदलपूर उच्च माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक रामचंद्र पासवान आणि शिक्षक रामाश्रय यादव यांचे शाळेतील एका शिक्षिकेसोबत त्रिकोणी प्रेमसंबंध होते. त्यामुळं नेमबाज मुकेश यादवला सुपारी देण्यात आल्याचं समोर आलं आहे. मुकेशने त्याच्या इतर साथीदारांसोबत मिळून ही घटना घडवून आणली.

याशिवाय परस्पर वैमनस्यातून रामाश्रय यादव यांची हत्या करण्यात आली होती. बहेरा येथील रहिवासी गंगा यादव, लालो यादव आणि हिरा यादव या तिघांनीही शिक्षकाच्या हत्येची सुपारी दिली होती. गावात वर्चस्व प्रस्थापित करण्यावरून गंगा यादव यांचा रामाश्रय यांच्याशी वाद झाला होता. त्यांच्यात बराच काळ वैर होते.

शाळेत जात असताना फिल्मी स्टाईल हत्या -

२८ जानेवारी रोजी अदलपूर सरकारी शाळेतील शिक्षक रामाश्रय यादव यांची रस्त्याच्या मधोमध गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सकाळी साडेनऊच्या सुमारास शिक्षक दुचाकीवरून शाळेत जात असताना ही घटना घडली. हल्लेखोरांनी त्यांना दुचाकीवरून ओव्हरटेक केले, त्यानंतर त्याच्या डोक्यात गोळी झाडून तेथून पळ काढला. रामाश्रय यादव यांच्यासोबत दुचाकीवर एक महिला शिक्षिकाही होती.

Shrikant Ashok Londhe

TwittereMail

श्रीकांत लोंढे हिंदुस्तान टाइम्स-मराठी मध्ये चीफ कन्टेन्ट प्रोड्यूसर आहे. प्रादेशिक, राष्ट्रीय, राजकीय व गुन्हेविषयक बातम्या कव्हर करतो. प्रिंट आणि डिजिटलमध्ये एकूण १४ वर्षांचा अनुभव. यापूर्वी दैनिक लोकमत, लोकमत समाचार, ईनाडू न्यूज, ईटीव्ही-भारत मध्ये रिपोर्टिग आणि डेस्कवरील कामाचा अनुभव. विशेष स्टोरीज, क्रीडा, राजकारण, मनोरंजन तसेच बिझनेसच्या बातम्याही कव्हर करतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर