रीलसाठी भररस्त्यात मैत्रिणीच्या खांद्यावर चढून शाळकरी मुलींची स्टंटबाजी, पुढं जे घडलं ते Video मध्ये पाहा
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  रीलसाठी भररस्त्यात मैत्रिणीच्या खांद्यावर चढून शाळकरी मुलींची स्टंटबाजी, पुढं जे घडलं ते Video मध्ये पाहा

रीलसाठी भररस्त्यात मैत्रिणीच्या खांद्यावर चढून शाळकरी मुलींची स्टंटबाजी, पुढं जे घडलं ते Video मध्ये पाहा

Published Jun 25, 2024 01:28 PM IST

School Girl Stunt : एक मुलगी रस्त्यात उभी आहे. तर तिची मैत्रिण हवेत बॅकफ्लिप मारण्याच्या उद्देश्याने तिच्या खांद्यावर चढते. मात्र हा स्टंट तिच्या चांगलाच अंगलट येतो.

मैत्रिणीच्या खांद्यावर चढून शाळकरी मुलींची स्टंटबाजी
मैत्रिणीच्या खांद्यावर चढून शाळकरी मुलींची स्टंटबाजी

सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक आपला जीव धोक्यात घालून रील व व्हिडिओ बनवत आहेत. रील बनवण्याच्या नादात लोकांना भानही राहात नाही की, हे त्यांच्यासाठी जीवघेणे ठरू शकते. लोक सोशल मीडियावर इतके वाहवत चालले आहेत की, त्यांना आपल्या जीवाची पर्वा आहे ना इज्जतीची. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये दोन शाळकरी मुली भररस्त्यात धोकादायक स्टंट करताना दिसत आहेत.

व्हिडिओमध्ये दिसते की, एक मुलगी रस्त्यात उभी आहे. तर तिची मैत्रिण हवेत बॅकफ्लिप मारण्याच्या उद्देश्याने तिच्या खांद्यावर चढते. मात्र स्टंट तेव्हा फसतो जेव्हा उलटी उडी मारण्याच्या प्रयत्न करणारी मुलगी सुरक्षितपणे उतरण्यात अपयशी ठरते. ती रस्त्यावर जोरात आपटते व जखमी होते.

पाहा व्हिडिओ -

 

भर रस्त्यात मुलींचा खतरनाक स्टंट -

एक मुलगी रस्त्याच्या मधोमध उभी आहे, तर तिची मैत्रिण तिच्या खांद्यावर चढते व हवेत बॅकफ्लिप मारते. मात्र मुलीचा स्टंट तिच्या अंगलट येतो. बॅकफ्लिप मारल्यानंतर ती रस्त्यावर जोरात आपटते. यात मुलाच्या कंबरेला दुखापत होते. त्यानंतर दिसते की, मुलीच्या मैत्रिणी तिला आधार देऊन रस्त्यावरून घेऊन जात आहेत.

इंस्टाग्रामवर "कमर टूट गई" कॅप्शनसह पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ १७ लाख लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओ पाहून यूजर्स वेगवेगळे कमेंट करत आहेत. अनेक युजर्स मुलींच्या कृत्यावर टीका करत आहेत..

एका यूजरने कमेंट केली आहे की, सार्वजनिक रस्त्यांवर धोकादायक स्टंट करण्यासाठी हे खेळाचे मैदान नाही. अनेक युजर्संनी अशा कृत्यांत सावधगिरी व सुरक्षेचे महत्व सांगितले आहे. अनेकांनी प्रसिद्धीसाठी असे खतरनाक स्टंट करण्याच्या प्रवृत्तीवर टीका केली आहे. एका यूजरने अनेक सोशल मीडिया यूजर्सकडून शेअर करण्यात आलेली भावना व्यक्त करत म्हटले की, अशा प्रकारच्या धोकादायक कृत्यांचे कौतुक करणे समस्येचे मूळ आहे.अन्य एकायूजरने कमेंट करताना म्हटले की, पापाची परी उडाली, दुसऱ्याने लिहिले की, मुलांना खेळ नाही हा ताई. तिसऱ्याने लिहिले की, पापाची परी उडत उडत खाली पडली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर