SBI Recruitment 2024 : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी; जाणून घ्या पद, पात्रता आणि निवड प्रक्रिया
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  SBI Recruitment 2024 : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी; जाणून घ्या पद, पात्रता आणि निवड प्रक्रिया

SBI Recruitment 2024 : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी; जाणून घ्या पद, पात्रता आणि निवड प्रक्रिया

Jul 09, 2024 06:11 PM IST

Bank Jobs 2024 : स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआयमध्ये एससीओ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली. या पदांसाठी इच्छुक असेलेले उमेदवार बँकेची अधिकृत वेबसाइट sbi.co.in येथे अर्ज करू शकतात.

एसबीआयमध्ये नोकरी करण्याची संधी
एसबीआयमध्ये नोकरी करण्याची संधी

SBI recruitment news : बँकेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे.  स्टेट बँक ऑफ इंडियाध्ये उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र उमेदवार एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटवरून sbi.co.in येथे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेत संस्थेतील १६ पदे भरण्यात येणार आहेत. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊयात.

या भरती अतंर्गत वरिष्ठ उपाध्यक्ष (आयएस ऑडिटर- २ जागा), सहाय्यक उपाध्यक्ष (आयएस ऑडिटर- ३ जागा),व्यवस्थापक (आयएस ऑडिटर- ४ जागा) आणि उपव्यवस्थापक (आयएस ऑडिट- ७ जागा) रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आले.  अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जुलै २०१४ पर्यंत आहे. यानंतर उमेदवारांनी केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे माहिती तंत्रज्ञान / संगणक विज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि इंस्ट्रुमेंटेशनमध्ये बीई / बीटेकची पदवी असणे आवश्यक आहे. या पदासाठी विहित शैक्षणिक पात्रता किमान आहे.  

निवड प्रक्रिया

कंत्राटी पदासाठी शॉर्ट लिस्टिंग, मुलाखत आणि सीटीसी निगोशिएशन आणि नियमित पदासाठी शॉर्ट-लिस्टिंग आणि मुलाखत यानंतर उमेदवारांची निवड केली जाईल. मुलाखत १०० गुणांची असेल. मुलाखतीतील पात्रता गुण बँकेकडून निश्चित केले जातील. केवळ मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे निवडीसाठी गुणवत्ता यादी उतरत्या क्रमाने तयार केली जाईल.

अर्ज शुल्क

जनरल / ईडब्ल्यूएस / ओबीसी उमेदवारांसाठी अर्ज शुल्क आणि सूचना शुल्क (नॉन-रिफंडेबल) ७५०/- रुपये आहे आणि एससी / एसटी / पीडब्ल्यूबीडी उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीत. उमेदवारांना ऑनलाईन माध्यमातून अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. डेबिट कार्ड/ क्रेडिट कार्ड/ इंटरनेट बँकिंग इत्यादींचा वापर करून स्क्रीनवर विचारल्याप्रमाणे माहिती देऊन पेमेंट करता येईल. अधिक संबंधित माहितीसाठी उमेदवार एसबीआयची अधिकृत वेबसाइट पाहू शकतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर