SBI SCO Recruitment 2024: बँकेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठा आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियात स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर पदासाठी अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवार एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटवरून sbi.co.in येथे ऑनलाईन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊयात.
या भरतीअंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडियात विविध पदे भरली जात आहेत. या भरती प्रक्रियेला २७ नोव्हेंबर २०२४ रोजी सुरू झाली. तर, अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ डिसेंबर २०२४ पर्यंत चालणार आहे.
निवड प्रक्रियेत शॉर्टलिस्टिंग, मुलाखत आणि सीटीईचा समावेश असेल. मुलाखत १०० गुणांची असेल. मुलाखतीतील पात्रता गुण बँकेकडून निश्चित केले जातील. केवळ मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे निवडीसाठी गुणवत्ता यादी उतरत्या क्रमाने तयार केली जाईल. एसएससी सीएचएसएल टियर २ उत्तर कुंजी 2024: ssc.gov.in हरकती नोंदविण्याचा शेवटचा दिवस, डाउनलोड करण्याच्या स्टेप्स आणि तपशील येथे पाहा.
सामान्य / ईडब्ल्यूएस / ओबीसी उमेदवारांसाठी अर्ज शुल्क आणि सूचना शुल्क ७५०/- रुपये आहे आणि एससी / एसटी / पीडब्ल्यूबीडी उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क / सूचना शुल्क नाही. डेबिट कार्ड/ क्रेडिट कार्ड/ इंटरनेट बँकिंग इत्यादींचा वापर करून स्क्रीनवर विचारल्याप्रमाणे माहिती देऊन पेमेंट करता येते. अधिक संबंधित माहितीसाठी उमेदवार एसबीआयची अधिकृत वेबसाइट पाहू शकतात.