गावात सुरू झाली SBI ची शाखा; लाच घेऊन नोकऱ्या दिल्या, ठेवी स्वीकारल्या अन् नंतर समोर आला धक्कादायक प्रकार
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  गावात सुरू झाली SBI ची शाखा; लाच घेऊन नोकऱ्या दिल्या, ठेवी स्वीकारल्या अन् नंतर समोर आला धक्कादायक प्रकार

गावात सुरू झाली SBI ची शाखा; लाच घेऊन नोकऱ्या दिल्या, ठेवी स्वीकारल्या अन् नंतर समोर आला धक्कादायक प्रकार

Updated Oct 07, 2024 05:08 PM IST

SBI Bank Branch : छत्तीसगडच्या सक्ती जिल्ह्यातील एक छोटे गाव छापोरामध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)ची एक बनावट शाखा चालवली जात होती.

बनावट बँकेचा प्रकार उघड
बनावट बँकेचा प्रकार उघड

तुम्ही पैसे जमा करत असलेली बँक खरी आहे की बनावट शाखा उघडून लोकांना लुबाडण्यासाठी सुरू केलेली आहे? हे तुम्हाला माहिती आहे का? SBI बाबत असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे लोकांना लुटण्यासाठी SBI चा बोर्ड लावून, कर्मचाऱ्यांची नेमणूक करून नकली शाखा चालवली जात होती. लोकांनी येथे खाते सुरू करून पैसे जमा केले काहींनी एफडी सुरू केली. छत्तीसगडच्या सक्ती जिल्ह्यातील एक छोटे गाव छापोरामध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ची एक बनावट शाखा चालवली जात होती. छत्तीसगडची राजधानी रायपूरपासून साधारण २०० किलोमीटरच्या अंतरावर हे छापोरा गाव आहे.

ही बँक वैभवी कॉम्प्लेक्स नावाच्या इमारतीत सुरू होती व कोणाला शंकाही येणार नाही इतक्या बेमालुमपणे सुरू होती. गावात बँक सुरू होताच लोकांनी आपले पैसे बँकेत जमा करायला सुरू वात केली.

सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात छपोरा गावात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नावानं एक शाखा सुरू झाली. आता बँकेची कामं गावातच होतील, यामुळे ग्रामस्थ आनंदित होतं. मात्र त्यांचा आनंद फार काळ टिकू शकला नाही.

तोतयागिरीचा पर्दाफाश कसा झाला?

सर्वप्रथम डबरा SBI शाखेच्या व्यवस्थापकाला या शाखेबाबत संशय आहे. २७ सप्टेंबर रोजी त्यांनी पोलीस व SBI अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर चौकशी सुरू झाली. जेव्हा अधिकारी छपोरा गावात पोहोचले तेव्हा समोर आले की, स्टेट बँकेची ही खरी शाखा नसून बनावट शाखा आहे. बँकेत SBI चे बॅनर-पोस्टर लावले होते. काउंटरही अन्य स्टेट बँकेसारखेच बनवले होते. अनेक लोक या बँकेत खाते सुरू करून आर्थिक व्यवहार करत होते.

कर्मचाऱ्यांची नियुक्तीही बनावट -

या बँकेने केवळ गावकऱ्यांनाच चुना लावला असे नाही तर नोकरीच्या नावावर बेरोजगार तरुणांनाही गंडा घातला आहे. मॅनेजर, कॅशियर, मार्केटिंग ऑफिसर आणि कम्प्यूटर ऑपरेटर आदि पदांवर भरती करण्यासाठी तरुणांकडून २ ते ६ लाख रुपयांची लाच घेतली गेली. त्यांना हुबेहुब दिसणारे ऑफर लेटरही देण्यात आले. त्यांना बँकिंग व्यवहाराची संपूर्ण ट्रेनिंग दिली गेली. 

भाड्याच्या जागेत चालवली जात होती बँक- 

ही बनावट बँक गावातील तोष चंद्र यांच्या भाड्याच्या कॉम्प्लेक्समध्ये चालवली जात होते. त्यांना प्रतिमहिना ७ हजार भाडे दिले जात होते. पोलिसांनी ही बनावट शाखा सील केली असून तपास सुरू आहे. या घटनेमुळे समजते की, धोकेबाज गरीब, अशिक्षित तसेच बेरोजगार तरुणांना लुटण्यासाठी काय-काय फंडे करू शकतात. लोकांना अशा फसवणुकीपासून सावध राहण्याची गरज आहे.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर