SBI: सरकारी नोकरीची संधी! एसबीआयमध्ये लिपिक पदाच्या १३,७३५ जागा भरणार, आजपासून नोंदणीला सुरुवात
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  SBI: सरकारी नोकरीची संधी! एसबीआयमध्ये लिपिक पदाच्या १३,७३५ जागा भरणार, आजपासून नोंदणीला सुरुवात

SBI: सरकारी नोकरीची संधी! एसबीआयमध्ये लिपिक पदाच्या १३,७३५ जागा भरणार, आजपासून नोंदणीला सुरुवात

Dec 17, 2024 06:21 PM IST

SBI Recruitment 2024: एसबीआयमध्ये लिपिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून ज्या उमेदवारांना बँकिंग क्षेत्रात करिअर बनवायचे आहे त्यांच्यासाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

सरकारी नोकरी: एसबीआयमध्ये लिपिक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू
सरकारी नोकरी: एसबीआयमध्ये लिपिक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू

SBI Clerk Recruitment 2024: बँकेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआयमध्ये लिपिक पदांच्या एकूण १३ हजारांहून अधिक जागांसाठी आजपासून भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवार एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटवरून sbi.co.in येथे ऑनलाईन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊयात.

एसबीआयच्या या भरती मोहिमेंतर्गत एकूण १३ हजार ७३५ जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवार एसबीआयचे अधिकृत संकेतस्थळ https://bank.sbi/web/careers/current-openings  किंवा https://www.sbi.co.in/web/careers/current-openings यावरून  ऑनलाइन अर्ज करू शकतात.  उमेदवार ७ जानेवारीपर्यंत अर्ज करू शकतात. अधिसूचनेनुसार, एसबीआय क्लर्क टियर -१ परीक्षा फेब्रुवारी २०२५ मध्ये होईल आणि मुख्य परीक्षा मार्च-एप्रिल २०२५ मध्ये होईल.

कुठे किती जागा?

मध्य प्रदेश- १ हजार ३१७, छत्तीसगड- ४८३, चंदीगड- ३२, दिल्ली- ३४३, जम्मू-काश्मीर- १४१, हिमाचल- १७०, पंजाब- ५६९, राजस्थान- ४४५, उत्तर प्रदेश- १ हजार ८९४, उत्तराखंड- ३१६, बिहार- १ हजार १११, गुजरात- १ हजा ०७३ आणि झारखंडमध्ये ६७६ जागा रिक्त आहेत. अधिसूचनेनुसार उमेदवार केवळ एका राज्यासाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी आपण ज्या राज्यासाठी अर्ज करत आहात, त्या राज्यातील स्थानिक भाषेचे (वाचन, लेखन, बोलणे आणि समजून घेणे) चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे.

राखीव जागा

महत्त्वाचे म्हणजे, रिक्त पदांपैकी ५ हजार ८७० जागा अनारक्षित आहेत. एससी- २ हजार ११८, अनुसूचित जमाती- १ हजार ३८५, ओबीसी- ३ हजार १ आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी १ हजार ३६१3 जागा राखीव आहेत.

पात्रता

मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा उच्च शिक्षण संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी. अंतिम वर्षाचे विद्यार्थीही अर्ज करू शकतात. परंतु, पदवी ३१ डिसेंबर २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी प्राप्त झालेली असणे बंधनकारक आहे.

वयाची अट

२० ते २८ वयोगटातील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. उमेदवाराचा जन्म २ एप्रिल १९९६ पूर्वी आणि १ एप्रिल २००४ नंतर नसावा. वयाची गणना १ एप्रिल २०२४ पासून केली जाईल. एससी आणि एसटी प्रवर्गाला वयोमर्यादेत पाच वर्षे आणि ओबीसींना तीन वर्षांची सवलत देण्यात येणार आहे.

निवड प्रक्रिया आणि पगार

सर्वप्रथम ऑनलाइन पूर्व परीक्षा होईल. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना ऑनलाइन मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाईल. मुख्य परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना स्थानिक भाषेची परीक्षा द्यावी लागणार आहे. अर्ज भरताना स्थानिक भाषेची चाचणी घेण्यात येणार आहे.  पात्र ठरलेल्या उमेदवाराला १७ हजार ९०० रुपये ते ४७ हजार ९२० रुपये पगार देण्यात येईल. तसेच त्यांचा बेसिक पे १९ हजार ९०० असेल.

पूर्व परीक्षेचा पॅटर्न

ही परीक्षा १ तासाची असेल, ज्यामध्ये इंग्रजी भाषा, संख्यात्मक क्षमता आणि रीजनिंग अ‍ॅबिलिटीशी संबंधित एकूण १०० वस्तुनिष्ठ प्रश्न असतील. पूर्व परीक्षेसाठी १०० गुण असतील. इंग्रजी विभागासाठी ३० गुण आणि न्यूमेरिकल आणि रीजनिंगसाठी ३५-३५ गुण असतील. संपूर्ण परीक्षेसाठी उमेदवाराला एक तास आणि एका विभागाचे प्रश्न सुमारे २० मिनिटांत सोडवावे लागतील. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी तिमाही गुण कापले जातील

अर्ज शुल्क

सामान्य, ईडब्ल्यूएस, ओबीसी - ७५० रुपये

एससी, एसटी, दिव्यांग प्रवर्ग - नो फी

महत्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख -१७ डिसेंबर २०२४

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ७ जानेवारी २०२५

पूर्व परीक्षा तारीख - फेब्रुवारी २०२५

मुख्य परीक्षा - मार्च एप्रिल २०२५

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर