Germany Christmas market News: सौदी अरेबियाच्या एका डॉक्टरने जाणूनबुजून जर्मनीतील मॅग्डेबर्ग येथील ख्रिसमस मार्केटमधील लोकांना चिरडले. या घटनेत एका लहान मुलाहसह दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ६० हून अधिक लोक जखमी झाले असून त्यातील १५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी जर्मनी पोलिसांनी आरोपी चालकाला अठक अटक केली असून त्याच्याविरोधात पुढील कारवाईला सुरुवात केली आहे. या घटनेमुळे ख्रिसमस मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी जाणाऱ्या लोकांमध्ये भिती निर्माण झाली आहे.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओत दिसत आहे की, ख्रिसमस मार्केटमध्ये लोक खरेदी करत आहे. तितक्यात एक भरधाव कार त्यांना चिरडत पुढे निघून जाते. यानंतर घटनास्थळ खळबळ माजते. लोक जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावतात. यानंतर जर्मनी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ५० वर्षीय आरोपीला अटक केली. मात्र, या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ६८ जण जखमी झाले असून त्यापैकी १५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
सॅक्सनी-अनहाल्ट राज्याच्या गृहमंत्री तमारा झेशांग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, या घटनेतील आरोपी सौदीचा डॉक्टर आहे. तो २००६ मध्ये जर्मनीत आला होता. मॅग्डेबर्गच्या दक्षिणेला ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या बर्नबर्ग मध्ये तो वैद्यकशास्त्राचा सराव करतो. या घटनेतील आरोपीला अटक करण्यात आले असून शहराला आता दुसरा कोणतही धोका नाही. ख्रिसमस मार्केटमधील घटना आमच्यासाठी मोठी शोकांतिका असल्याचे ते म्हणाले.
जर्मनीत दरवर्षी १,००० हून अधिक तात्पुरते ख्रिसमस मार्केट उभे राहतात आणि ते यापूर्वीही दहशतवाद्यांचे लक्ष्य ठरले आहे गेल्या महिन्यात जर्मनीतील पोलिसांनी ख्रिसमस मार्केटवर हल्ला करण्याच्या प्लॅनची देवाणघेवाण केल्याच्या संशयावरून दोन अल्पवयीन मुलांना अटक केली होती, परंतु या कथित योजनांचा शुक्रवारी झालेल्या हल्ल्याशी काहीही संबंध नसल्याचे दिसून येत आहे. जर्मनीमध्ये अंदाजे २,५०० ते ३,००० ख्रिसमस मार्केट आहेत, जे नोव्हेंबरच्या अखेरीस ते ख्रिसमसनंतर सुमारे महिनाभर देशभरात सुरू असतात. नोव्हेंबरमध्ये पद सोडण्यापूर्वी जर्मनीच्या देशांतर्गत गुप्तचर संस्थेचे प्रमुख थॉमस हल्डेनवांग यांनी मध्यपूर्वेतील युद्धामुळे देशाच्या धोक्याची पातळी अधिक असल्याचा इशारा दिला होता.
महत्त्वाचे म्हणजे, जर्मनीत याआधीही असा हल्ला झाला आहे. 19 डिसेंबर 2016 रोजी बर्लिनमध्ये एका इस्लामी आत्मघातकी हल्लेखोराने ख्रिसमस च्या दुकानदारांच्या गर्दीवर ट्रकला धडक दिली होती. या दुर्घटनेत १३ जण ांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.