मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  satyendar jain : तिहार तुरुंगातील बाथरूममध्ये घसरून पडलेले माजी मंत्री सत्येंद्र जैन व्हेंटिलेटरवर
satyendar jain
satyendar jain

satyendar jain : तिहार तुरुंगातील बाथरूममध्ये घसरून पडलेले माजी मंत्री सत्येंद्र जैन व्हेंटिलेटरवर

25 May 2023, 13:29 ISTGanesh Pandurang Kadam

satyendar jain on Oxygen support : तिहार तुरुंगात असलेले दिल्ली सरकारमधील माजी मंत्री सत्येंद्र जैन यांची प्रकृती खालावली असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे.

satyendar jain on ventilator : तिहार तुरुंगातील बाथरूममध्ये पडून जखमी झालेले दिल्ली सरकारमधील माजी मंत्री व आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र जैन यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. प्रकृती खालावल्यानंतर त्यांना दिल्लीच्या एलएनजेपी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सत्येंद्र जैन यांच्या मणक्याला यापूर्वीही दुखापत झाली होती. त्यांच्या आरोग्याच्या अनेक तक्रारी आहेत. त्यातच आज सकाळी ते बाथरूममध्ये घसरून पडले, तर ते चक्कर येऊन पडल्याचं 'आप'चं म्हणणं आहे.

S Somanath : इस्रोचे प्रमुख म्हणतात, विज्ञानाचा जन्म वेदांमधून झाला, पण पाश्चात्यांनी स्वत:च्या नावावर खपवला

मनी लाँड्रिंग सत्येंद्र जैन यांना सक्तवसुली संचालनालयानं अटक केली आहे. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत. जामीन मिळवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यांचं वजन ३५ किलोनं घटल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी न्यायालयातील सुनावणीत केला होता. सोमवारी त्यांना सफदरजंग हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं. तिथं मणक्याच्या आजाराबद्दल ओपीडीमध्ये सल्लामसलत केल्यानंतर त्यांना पुन्हा तिहार तुरुंगात नेण्यात आलं.

तुरुंग अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास सत्येंद्र जैन घसरले. त्यानं दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. पाठ, डावा पाय आणि खांदा दुखत असल्याच्या तक्रारीनंतर त्यांना डीडीयू रुग्णालयात पाठवण्यात आलं.

विभाग