मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video : विद्येची देवता सरस्वती नाही, सावित्रीबाई फुले आहेत; मुख्याध्यापिकेचा पूजेला नकार, पाहा!

Viral Video : विद्येची देवता सरस्वती नाही, सावित्रीबाई फुले आहेत; मुख्याध्यापिकेचा पूजेला नकार, पाहा!

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 29, 2024 05:05 PM IST

Rajasthan Teacher saraswati puja news : राजस्थानातील सरकारी शाळेतील मुख्याध्यापिकेनं सरस्वती पूजेला नकार दिल्यामुळं झालेल्या वादाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

Rajasthan School News
Rajasthan School News

Rajasthan Teacher saraswati puja news : राजस्थानच्या बारां जिल्ह्यातील सरकारी शाळेतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. एका महिला शिक्षिकेनं शाळेतील कार्यक्रमात सरस्वती देवीचा फोटो न लावल्यामुळं झालेल्या या वादाचा फोटो आहे. विद्येची देवता सरस्वती नसून सावित्रीबाई फुले आहेत. त्यांचा फोटो पुरेसा आहे, असं संबंधित शिक्षिकेनं म्हटलं आहे.

बारां जिल्ह्यातील किशनगंज भागातील लकदई गावातील सरकारी शाळेतील ही घटना आहे. गावकऱ्यांना सुनावणाऱ्या महिलेचं नाव हेमलता बैरवा असल्याचं समजतं. त्या शाळेच्या मुख्याध्यापिका असल्याचं समजतं. प्रजासत्ताक दिनी शाळेत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सावित्रीबाई फुले याचा फोटो ठेवण्यात आला होता. त्यांना हारही घालण्यात आले. मात्र, सरस्वती देवीचा फोटो ठेवण्यात आला नव्हता.

Viral Video : पुण्यात नोकरीच्या मुलाखतीसाठी ३ हजार इंजिनियर्सची रांग; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

सुरुवातीला काही शिक्षकांनी माता सरस्वतीचं चित्र ठेवण्याचा आग्रह धरला होता. मात्र, मुख्याध्यापिका बैरवा यांनी शिक्षकांचं ऐकलं नाही. ही बाब ग्रामस्थांना समजल्यानंतर ते तिथं धावले व सरस्वतीचा फोटो ठेवण्याची मागणी केली. हेमलता बैरवा यांनी त्यास विरोध केला. विद्येची देवता सरस्वती आहे. त्यामुळं तुम्हाला पूजा करावी लागेल. नाहीतर कार्यक्रम होऊ देणार नाही, असं गावकरी म्हणाले. मात्र, विद्येची देवी सरस्वती नसून सावित्रीबाई फुले आहेत. मी सरस्वतीची पूजा करणार नाही, असं शिक्षिका बैरवा यांनी गावकऱ्यांना सुनावलं. बराच वेळ बाचाबाची झाल्यानंतर गावचे सरपंच व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हा प्रकार वरिष्ठांना कळवला.

अधिकाऱ्यांनी बैरवा यांना फोन केला. मात्र, बैरवा आपल्या मतावर ठाम होत्या. सावित्रीबाई यांचा फोटो ठेवण्यात आला असून तो पुरेसा आहे, असं त्या म्हणाल्या. त्यामुळं गावकरी संतापले. त्यांनी सरस्वतीचा फोटो बळजबरीनं ठेवण्याचा प्रयत्नही केला.

या प्रकरणाबाबत तक्रार आल्याचं जिल्हा शिक्षणाधिकारी पियुष शर्मा यांनी मान्य केलं. या संपूर्ण प्रकरणाची सोमवारी समितीमार्फत चौकशी करून कारवाई केली जाईल, असं पियुष शर्मा यांनी सांगितलं. राजस्थानचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी या प्रकाराची माहिती नसल्याचं सांगितलं. चौकशी करून सत्य जाणून घेतलं जाईल आणि योग्य ती कारवाई केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Raj Thackeray : हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, तसं कधीच ठरलेलं नाही - राज ठाकरे

हिंदू, मुस्लिम सगळे सारखे आहेत!

सरस्वतीचा फोटो न लावणाऱ्या हेमलता बैरवा यांना काही गावकऱ्यांनी हिंदू परंपरेची आठवण करून दिली. त्यावर त्या संतापल्या. हिंदू, हिंदू हा काय प्रकार आहे? इथं हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सगळे समान आहेत. हा शाळेतला कार्यक्रम आहे, असं त्या म्हणाल्या.

WhatsApp channel

विभाग