मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Samsung Galaxy A35 : आकर्षक डिझाइन, भलामोठा डिस्प्ले आणि दमदार बॅटरी; सॅमसंग गॅलेक्सी ए३ मध्ये मिळतायेत भन्नाट फीचर्स!

Samsung Galaxy A35 : आकर्षक डिझाइन, भलामोठा डिस्प्ले आणि दमदार बॅटरी; सॅमसंग गॅलेक्सी ए३ मध्ये मिळतायेत भन्नाट फीचर्स!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 25, 2024 07:07 PM IST

Samsung Galaxy A35 : सॅमसंग गॅलेक्सी ए३५ मध्ये दमदार फीचर्स मिळत आहेत.

सॅमसंग कंपनीचा मिड-रेंज स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी ए ३५ मध्ये भन्नाट फीचर्स मिळत आहेत.
सॅमसंग कंपनीचा मिड-रेंज स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी ए ३५ मध्ये भन्नाट फीचर्स मिळत आहेत. (Aishwarya Panda/HT Tech)

Samsung Galaxy A35 Specifications: सॅमसंग कंपनीने जानेवारी महिन्यात त्यांचा नवा स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी एस सीरिज लॉन्च केली होती. यानंतर कंपनीने ग्राहकांना अधिक आकर्षित करण्यासाठी नवीन मिड-रेंज ए-सीरिज स्मार्टफोनची घोषणा केली आहे. यात सॅमसंग गॅलेक्सी ए ३५ आणि सॅमसंग गॅलेक्सी ए ५५ या दोन स्मार्टफोनचा समावेश आहे. या स्मार्टफोनमध्ये अनेक दमदार फीचर्स मिळत आहेत. हा फोन बाजारात असलेल्या पोको एक्स ६ प्रो, नथिंग फोन २ ए, ऑनर एक्स ९ बी यांसारखे अनेक नवीन मिड- रेंज स्मार्टफोनला टक्कर देईल, अशी अपेक्षा आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए ३५ च्या डिस्प्लेबद्दल चर्चा करूया. स्मार्टफोनमध्ये ६.६ इंचाचा एफएचडी+ एमोलेड पॅनेल असून १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए ३५ मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये ५० मेगापिक्सल आयसोसेल कॅमेरा आहे जो गॅलेक्सी ए ३४ मधील ४८ मेगापिक्सल सेन्सरपेक्षा अपग्रेड आहे. स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळत आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए ३५ सोबत तुम्हाला अँड्रॉइड १४ वर आधारित वनयूआय ६.१ मिळेल. या फोनमध्ये टेक्स्ट कॉल फीचर देखील देण्यात आले, जे गॅलेक्सी ए २४ सीरिजमध्ये देखील उपलब्ध आहे.

गॅलेक्सी ए ३५ मध्ये ५ हजार एमएएचची बॅटरी मिळत आहे, जी २५ वॉट फास्ट वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करतो. हा फोन चार्ज होण्यासाठी सुमारे २ तासांचा कालावधी लागतो. सॅमसंग गॅलेक्सी ए ३५ एक ऑलराऊंडर फोन आहे, परंतु उष्णतेची समस्या आहे. डिझाइन, स्विफ्ट यूआय, कॅमेरा आणि बॅटरी लाइफ यांसारख्या इतर क्षेत्रांमध्ये अव्वल आहे. या स्मार्टफोनचे मुख्य आकर्षण म्हणजे क्रिस्प डिस्प्ले. मिड रेंज स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे. आकर्षक डिस्प्ले आणि स्नॅपी कॅमेरा हवा असलेले ग्राहक हा फोन खरेदी करण्याचा विचार करू शकतात.लोक स्मार्टफोनचा आनंद घेतील. या सेगमेंटमध्ये स्पर्धा जास्त आहे, परंतु जर आपण सॅमसंगचा स्विफ्ट वनयूआय, आकर्षक डिस्प्ले परफॉर्मन्स आणि स्नॅपी कॅमेरा एक्सप्लोर करू इच्छित असाल तर आपण या डिव्हाइसचा विचार करू शकता.

 

WhatsApp channel

विभाग