मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  थोडं हटके.. पाण्याने भरलेलं सलून, केस कटिंगसाठी जावं लागेल गुडघ्यापर्यंतच्या पाण्यातून, पाहा Viral Video

थोडं हटके.. पाण्याने भरलेलं सलून, केस कटिंगसाठी जावं लागेल गुडघ्यापर्यंतच्या पाण्यातून, पाहा Viral Video

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 15, 2024 04:42 PM IST

Salon In Water : सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये पाण्याने भरलेलं एक सलून दिसत आहे. मात्र नेटिझन्सना हा प्रकार मूर्खपणाचा असल्याचे म्हटले आहे.

पाण्याने भरलेलं सलून
पाण्याने भरलेलं सलून

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत असूनयामध्ये एक पाण्याने भरलेलं सलून दिसत हे. मात्र लोकांना हे सलून बिल्कूल पसंत पडलेले नाही. व्हिडिओवर कमेंट करत त्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

काय आहे व्हिडिओमध्ये?

तुम्ही प्रत्येक महिन्याला किंवा दोन महिन्यातून एकदा तरी आपले केस कापण्यासाठी कोणत्या ना कोणत्या सलूनमध्ये जरूर जात असाल. काही सलूनमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या क्रिएटिव्हीटी दिसत असतील. मात्र तुम्ही कधी पाण्याने भरलेल्या सलून मध्ये गेला आहात का?, सोशल मीडियावर असेच एक सलून व्हायरल होत असून त्यामध्ये चारी बाजुला केवळ पाणीच पाणी दिसत आहे. एका व्यक्तीने आपल्या सलूनला अशा प्रकारे डिझाइन केले आहे. या सलूनमध्ये बसल्यानंतर तुम्हाला असे वाटेल की, एखाद्या नदीत बसून आपले केस कापत आहात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांनी यावर प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली आहे.

इंस्टाग्रामवर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पहिल्यांदा radenthebarber.lsm नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडिओ २ लाख २१ हजाराहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. या व्हिडिओवर एक युझरने म्हटले आहे की, आज इंटरनेटवर पाहिलेला सर्वात मोठा मूर्खपणा आहे. दुसऱ्याने म्हटले की, हे बॅक्टिरिया हाउस आहे. अन्य एका यूझरने लिहिले की, हे धोकादायक आहे, जर पाण्यात ब्लो ड्रायर पडला तर..

WhatsApp channel

विभाग