Viral news : बॉसचं चोर म्हणणं लागलं जिव्हारी! सेल्समननं विष प्राशन करून संपवलं जीवन; सुसाईड नोटमध्ये मांडली व्यथा-salesman having suicide because his boss called him chor in kota rajasthan ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral news : बॉसचं चोर म्हणणं लागलं जिव्हारी! सेल्समननं विष प्राशन करून संपवलं जीवन; सुसाईड नोटमध्ये मांडली व्यथा

Viral news : बॉसचं चोर म्हणणं लागलं जिव्हारी! सेल्समननं विष प्राशन करून संपवलं जीवन; सुसाईड नोटमध्ये मांडली व्यथा

Sep 07, 2024 07:54 PM IST

salesman suicide kota : राजस्थानमधील कोटा शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका सेल्समनने बॉसच्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केली. त्याच्या खोलीतून एक सुसाइड नोट देखील सापडली आहे, ज्यामध्ये त्याने शोरूम मॅनेजर मासिक छळाचा आरोप केला आहे.

बॉसचं चोर म्हणणं लागलं जिव्हारी! सेल्समननं विष प्राशन करून संवपलं जीवन; सुसाईड नोटमध्ये मांडली व्यथा
बॉसचं चोर म्हणणं लागलं जिव्हारी! सेल्समननं विष प्राशन करून संवपलं जीवन; सुसाईड नोटमध्ये मांडली व्यथा

salesman suicide kota : राजस्थानमधील कोटा शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सेल्समनने बॉसचया मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. कोटा येथील भीमगंज मंडी पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली आहे. विजयपाल (वय ४०) असे सेल्समनचे नाव असून तो नकपुरी इंद्र कॉलनी येथील रहिवासी होता. त्याने राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. त्याच्या खोलीतून एक सुसाइड नोट देखील सापडली आहे, यात आत्महत्या करत असल्याचं धक्कादायक कारण उघड झालं आहे.

विजयपालच्या खोलीत एक सुसाईड नोट सापडली आहे. ज्यामध्ये त्याने शोरूमच्या मालकावर मानसिक छळ केल्याचा आरोप करत लिहिले आहे की, बॉसला तो नेहमी चोर वाटायचा. ऐवढंच नाही तर बॉस त्याला वारांवार चोर म्हणून हाक मारायचा. बॉसचया सांगण्यावरुण पोलिसही त्याला पोलिस ठाण्यात बोलावून त्रास देत होते. पोलिसांनी मृतदेहाचे पोस्टमार्टम करून कुटुंबीयांच्या ताब्यात दिले आहे. तसेच या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.

शोरूममध्ये १९ वर्षे केलं काम

मृत विजयपालची पत्नी कांचन हिने सांगितले की, विजयपाल हा कोटा येथील घोडे वाला बाबा चौकात असलेल्या इलेक्ट्रॉनिक शोरूममध्ये गेल्या १९ वर्षांपासून काम करत होता. या शोरूमच्या गोदामात वर्षभरापूर्वी चोरी झाली होती. यामध्ये तिच्या पतीवर वारंवार चोरीचा आरोप करत त्याला चोर म्हणत मॅनेजर त्याला त्रास देत होता.

पत्नीचे म्हणणे आहे की, २२ ऑगस्ट रोजी पती तिला उत्तर प्रदेशातील पेहार येथे सोडण्यासाठी गेला होता. त्यानंतर ४ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता आम्ही त्यांच्याशी शेवटचे बोललो. त्यानंतर त्याने विष प्राशन केल्याचे सासरच्या मंडळींकडून समजले. आज सकाळी खोलीतील बेडशीट जुळवल्यानंतर सुसाईड नोट सापडली. या चिठ्ठीत पतीने बॉसवर छळ केल्याचा आरोप केला आहे.

काय आहे सुसाईड नोटमध्ये ?

विजयपालने विष प्राशन करण्यापूर्वी सुसाईड नोटमध्ये बरेच काही लिहिले होते. माझ्या इच्छेनुसार मी आत्महत्या करत आहे, असे त्यात त्याने लिहिले होते. माझ्या मृत्यूनंतर माझ्या कुटुंबाला कोणी त्रास देऊ नये. भाऊ, कृपया माझ्या पत्नी कांचनला ऑफिसमधून नुकसानभरपाई मिळेल याची खात्री करा. मी एक वर्षापासून नैराश्यात आहे. काय करावे समजत नाही. वर्षभरापूर्वी आमच्या कार्यालयात नवीन काम आले. सर्व कर्मचारी तिथे काम करायचे, पण २ महिन्यांनी त्या ठिकाणी चोरी झाली. संपूर्ण गोदाम आणि कार्यालय मी एकट्याने सांभाळले. मी काही चोरले नाही. माझे वय १९ वर्षाखालील आहे. मी एक खिळाही चोरला नाही, तरीही त्यांनी माझ्यावर चोर असल्याचा आरोप केला. मला विज्ञाननगर पोलीस ठाण्यात खूप त्रास दिला गेला. वर्षभरापासून हा त्रास सहन करून मी निराश झालो आहे. मी माझी नोकरीही सोडू शकत नाही, नाहीतर मी न केलेल्या गोष्टीसाठी लोक मला दोष देतील.

Whats_app_banner
विभाग