Sadhguru Jaggi Vasudev Health Updates: आध्यात्मिक गुरू आणि ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या मेंदूवर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. दिल्लीतील अपोलो रुग्णालयात १७ मार्चला त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. आता त्यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली. सदगुरू जग्गी वासुदेव यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे.
मेंदूत सूज आल्यानंतर सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.अपोलो हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार न्यूरोलॉजिस्ट डॉ. विनीत सूरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'वासुदेव यांना गेल्या चार आठवड्यापासून तीव्र डोकेदुखीचे त्रास होत आहे. तीव्र वेदना होत असतानाही त्यांनी आपले सामाजिक उपक्रम सुरू ठेवले. त्यांनी ८ मार्च २०२४ रोजी महाशिवरात्रीचा सोहळाही पार पाडला. वेदनांकडे दुर्लक्ष करत त्यांनी सर्व बैठका सुरू ठेवल्या. परंतु, १५ मार्चला डोकेदुखी वाढल्याने सद्गुरुंनी डॉ. सूरी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. यानंतर त्यांची समस्या गंभीर असल्याचे आम्हाला समजले.'
पुढे डॉक्टर म्हणाले की, त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांना १७ मार्च रोजी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचे सीटी स्कॅन केले असता त्यांच्या मेंदूत सूज आल्याचे समजले. यामुळे तात्काळ शस्त्रक्रिया करावी लागली. सद्गुरु यांच्या मेंदूवरील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे.तसेच त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे, असे डॉक्टरांनी सांगितले.
सद्गुरुंनी पर्यावरण संवर्धनासाठी 'माती वाचवा' आणि 'रॅली फॉर रिव्हर्स' अशा अनेक मोहिमा राबविल्या आहेत. १९८२ पासून ते योग शिकवत आहेत. न्यूयॉर्क टाइम्सच्या बेस्टसेलर 'इनर इंजिनीअरिंग : अ योगीज गाइड टू जॉय अँड कर्मा: अ योगीज गाइड टू क्राफ्टिंग युअर डेस्टिनी' या पुस्तकाचे ते लेखक आहेत.
संबंधित बातम्या