देशाला हादरवणारी घटना! शाळेच्या प्रगतीसाठी शाळा व्यवस्थापकाने वडिलांच्या मदतीने दिला दोन विद्यार्थ्यांचा नरबळी-sacrificed child for the progress of school brutality of managers father in hathras uttar pradesh ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  देशाला हादरवणारी घटना! शाळेच्या प्रगतीसाठी शाळा व्यवस्थापकाने वडिलांच्या मदतीने दिला दोन विद्यार्थ्यांचा नरबळी

देशाला हादरवणारी घटना! शाळेच्या प्रगतीसाठी शाळा व्यवस्थापकाने वडिलांच्या मदतीने दिला दोन विद्यार्थ्यांचा नरबळी

Sep 27, 2024 12:37 PM IST

Hathras Student Murder Case : उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये मानवतेला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. येथे शाळेच्या प्रगतीसाठी शाळा व्यवस्थापक शिक्षक आणि त्याच्या तांत्रिक वडिलांनी इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्याचा बळी दिल्याचे उघड झालं आहे.

शाळेच्या प्रगतीसाठी शाळा व्यवस्थापकाने वडिलांच्या मदतीने दिला विद्यार्थ्यांचा नरबळी; धक्कादायक घटनेने हाथरस हादरलं
शाळेच्या प्रगतीसाठी शाळा व्यवस्थापकाने वडिलांच्या मदतीने दिला विद्यार्थ्यांचा नरबळी; धक्कादायक घटनेने हाथरस हादरलं

Hathras Student Murder Case : उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये मानवतेला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. गेल्या रविवारी हाथरस येथील निवासी शाळेच्या प्रगतीसाठी शाळा व्यवस्थापक शिक्षक व त्याच्या तांत्रिक वडिलांनी इयत्ता दुसरीच्या दोन विद्यार्थ्यांचा नरबळी दिला. ही घटना उघड झाल्यावर गुरुवारी पोलिसांनी या प्रकरणी आरोपी व्यवस्थापक शिक्षक, त्याचे तांत्रिक वडिलांसह पाच जणांना अटक केली.

कोतवाली साहपाऊ भागातील रासगनवा गावात चालणाऱ्या डीएल पब्लिक स्कूल या निवासी शाळेतील ११ वर्षीय कृतार्थ कुशवाह रहिवासी तुरसैन याचा गळा दाबून खून करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिस निरीक्षक सदाबाद हिमांशू माथूर यांनी सांगितले की, शाळेच्या व्यवस्थापकाचे वडील जशोधन सिंग. दिनेश बघेल हे तांत्रिक विधी करतात. वडिलांसह शाळेच्या व्यवस्थापकाने शाळेच्या प्रगतीसाठी मुलाचा बळी देण्याचा कट आखला. गेल्या रविवारी रात्री शाळेच्या आतील हॉलमध्ये झोपलेल्या कृतार्थ या विद्यार्थ्यांचा गळा आवळून बळी देण्यात आला. यानंतर व्यवस्थापक आपल्या गाडीतून विद्यार्थ्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणार होते. कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुलाचा मृतदेह शाळा व्यवस्थापकाच्या गाडीत सापडला.

वसतिगृह चालकाकडून कुटुंबीयांची दिशाभूल

मुलाच्या हत्येनंतर शाळेच्या व्यवस्थापनाने मुलाच्या घरी फोन करून कृतार्थ आजारी असल्याची माहिती दिली. यानंतर कुटुंबीय शाळेत पोहोचले असता त्यांना कृतार्थ सापडला नाही. वसतिगृह संचालक दिनेश बघेल यांना विद्यार्थ्यांच्या उपचाराबद्दल विचारले असता त्यांनी त्यांची दिशाभूल केली. कृतार्थला उपचारासाठी घेऊन गेल्याचे ते सांगत राहिले. काही वेळाने या लोकांनी दिनेश बघेलला त्याच्या कारसह सादाबादजवळ पकडले.

शवविच्छेदन अहवालातून सत्य आले समोर  

यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यांना कृतार्थचा मृतदेह मागच्या सीटवर पडलेला आढळून आला. यानंतर पोलिसांनी मृताचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. यात विद्यार्थ्याची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

एसपी कार्यालयाला संतप्त नातेवाईकांचा घेराव  

खून प्रकरण उघड करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी एसपी कार्यालयाला घेराव घातला होता. विद्यार्थ्याच्या हत्येची घटना लवकरात लवकर उघड करण्याची मागणी कुटुंबीयांनी एसपी हाथरस यांच्याकडे केली होती. यावेळी महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्याचवेळी, पोलीस अधिकाऱ्यांनी एसपी कार्यालयाला घेराव घातल्यानंतर अवघ्या काही तासांनी हा प्रकार उघडकीस आला.

कृतार्थ हा इयत्ता २ रीत शिकत होता. कृतार्थच्या वडिलांचे नाव श्री कृष्ण असून त्यांनी कृतार्थला साहपौ परिसरातील रासगवान गावातील डीएल पब्लिक स्कूल निवासी शाळेत शिक्षण घेण्यासाठी ठेवले होते. सोमवारी सकाळी शाळेचे व्यवस्थापक दिनेश बघेल यांनी कृतार्थची तब्येत खराब असल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांना दिली. कृतार्थचे वडील श्री कृष्णा यांनी शाळेचे संचालक दिनेश बघेल यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी विद्यार्थी कृतार्थचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला होता. शवविच्छेदन अहवालात विद्यार्थ्याची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्या मानेवर जखमेच्या खुणा होत्या.

पोलिसांनी माहिती दिली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॅनेजरचे वडील जशोधन भगत असून ते तंत्र विद्या करायचे. या तंत्रमंत्र आणि त्यागामुळे त्यांनी विद्यार्थी कृतार्थची हत्या केली. तंत्र-मंत्राचा वापर करून मुलाचा बळी दिल्यास आपली शाळा आणि व्यवसाय चांगला होईल, अशी अशा असल्याने व्यवस्थापक दिनेश बघेल आणि त्याचे वडील जशोधन यांनी कृतार्थचा बळी दिला.

 

Whats_app_banner