Navi Mumbai Viral Video : सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात मात्र काही व्हिडीओ आपल्या काळजाचा ठोका चुकवतात. अशातच सेकंदाभरात धडकी भरवणारा व्हिडीओ नवी मुंबईतून समोर आला आहे. नवी मुंबईतील एका धान्याच्या गोडाऊनमध्ये छतापर्यंत रचण्यात आलेली पोत्यांची रास साफसफाई करणाऱ्या महिलेच्या अंगावर पडल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. महत्वाचं म्हणजे या ठिकाणी असलेल्या कामगारांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे महिलेचा जीव वाचला आहे.
व्हायरल व्हिडीओत नेमकं काय आहे?
व्हायरल झालेल्या व्हिडीओत गोडाऊनमध्ये असलेली महिला कर्मचारी साफसफाई करताना दिसत आहे. त्यावेळी साफसफाई करत असलेल्या महिलेचा एका धान्याच्या पोत्याला धक्का लागताच सगळे धान्याचे पोते महिलेच्या अंगावर पडतात. त्याचवेळी तिथं काम करत असलेले आठ ते दहा पोती उचलणारे कामगार एकामागून एक स्वतः हून पोती हटवण्याच्या कामाला लागले. सगळ्यांनी मिळून एकामागून एक पोती हटवण्याचा सुरुवात केली. त्यानंतर या सगळ्यांनी मिळून पोती हटवली आणि महिलेचा जीव वाचवला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यानंतर हा व्हिडीओ भरपूर प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहे. त्यात कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामगिरीचं नेटकरी कौतुक करताना दिसत आहे.