Viral Video : एअर होस्टेसनं ई-मेल आयडी विचारला, तरुण प्रवासी असं काही बोलला की सगळेच चकीत
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video : एअर होस्टेसनं ई-मेल आयडी विचारला, तरुण प्रवासी असं काही बोलला की सगळेच चकीत

Viral Video : एअर होस्टेसनं ई-मेल आयडी विचारला, तरुण प्रवासी असं काही बोलला की सगळेच चकीत

Published Aug 13, 2024 01:22 PM IST

Air Hostess Viral Video: युरोपियन एअरलाइन कंपनी रायन एअरच्या फ्लाइटमधील प्रवाशी आणि एअर हॉस्टेस यांच्यातील संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रायन एअरच्या फ्लाइटमधील व्हिडिओ व्हायरल
रायन एअरच्या फ्लाइटमधील व्हिडिओ व्हायरल

Ryan Air Passenger Prank On Air Hostess Video: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, हे सांगू शकत नाही. अनेक व्हिडिओ युजरचे मनोरंजन करण्यासाठी बनवले जातात. सध्या सोशल मीडियावर चेष्टा-मस्करी करणाऱ्या व्हिडिओचेही प्रमाण वाढले आहे, ज्याला प्रँक व्हिडिओ असे म्हटले जाते. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, ज्यात एक व्यक्ती विमानातून प्रवास करताना एअर होस्टेसशी प्रँक करीत आहे. व्हिडिओत एअर होस्टेस संबंधित प्रवाशाला त्याचा ईमेल आयडी विचारते. मात्र, यानंतर प्रवाशाने दिलेले उत्तर ऐकून त्याच्या आजूबाजुला बसलेल्या प्रवाशांना मोठा धक्काच बसला. या प्रवाशाने एअर होस्टेसला अस काय म्हटले आहे? हे व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

इंस्टाग्रामवर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ युरोपियन एअरलाइन कंपनी रायन एअरच्या फ्लाइटमधील दृश्य असल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडिओमध्ये दोन एअर होस्टेस प्रवाशांची माहिती गोळा करताना दिसत आहेत. त्यादरम्यान दोघांनी एका प्रवाशाला त्याचा ईमेल आयडी विचारला. त्यानंतर प्रवासी म्हणतो की, कॅन आय कीस यू? यावर एअर होस्टेस लगेच म्हणाली, आता मी तुला किस करू का? एअर होस्टेस आणि प्रवासी यांच्यातील संभाषण ऐकून लोक थक्क झाले. दुसरी एअर होस्टेस तिच्या सहकाऱ्याकडे पाहतच राहिली. काही सेकंदानंतर प्रवासी @gmail.com म्हणतो. म्हणजेच त्या प्रवाशाची ईमेल आयडी canikissyou@gmail.com अशी आहे. पण एअर होस्टेसला काहीतरी वेगळेच काही समजले.

प्रवाशाने आपली पूर्ण ईमेल आय़डी सांगताच आणि एअर होस्टेसचे उत्तर ऐकून इतर प्रवाशांना हसू आवरत नव्हते. एअर होस्टेस सुद्धा हसू लागली. संबंधित एअर होस्टेस लाजली आणि त्यानंतर ती देखील हसू लागली. हा व्हिडिओ @vessbroz नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला असून या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. या व्हिडिओवर कमेंट करताना एका युजरने असे म्हटले आहे की, त्याला या व्हिडिओमध्ये सर्वात जास्त एअर हॉस्टेसने दिलेले उत्तर आवडले आहे. प्रवाशाने कॅन आय कीस यू म्हटल्यानंतर एअर हॉस्टेस आता लगेच! असे विचारते. दुसऱ्याने युजरने म्हटले आहे की, असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. एका कॅफेमध्येही एका तरुणाने तिथे काम करणाऱ्या मुलीला अशीच इमेल आयडी सांगितली होती.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर