मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  युक्रेन युद्ध सुरू असतानाच पुतीन यांना झटका, आयसीसीने जारी केले अटक वारंट; काय आहे आरोप?

युक्रेन युद्ध सुरू असतानाच पुतीन यांना झटका, आयसीसीने जारी केले अटक वारंट; काय आहे आरोप?

Mar 17, 2023 11:20 PM IST

Russia Ukraine war : युक्रेन युद्धावरून आता रशियन राष्ट्रपती पुतीन यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट (ICC)ने शुक्रवारीपुतीन यांच्याविरोधात युक्रेनमधीलयुद्धगुन्ह्यासाठी जबाबदार धरत अटक वारंट जारीकेले आहे.

रशियन राष्ट्रपती पुतीन
रशियन राष्ट्रपती पुतीन

Russia Ukraine War Latest Update: रशिया आणि युक्रेन दरम्यान सुरू असलेल्या युद्धाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र अजूनही याचा निकाल लागला नाही. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या आदेशाने आतापर्यंत युक्रेनमधील अनेक शहरे क्षेपणास्त्राने उध्वस्त केली आहेत. यामध्ये अनेक नागरिकांचा जीव गेला आहे. युक्रेन युद्धावरून आता रशियन राष्ट्रपती पुतीन यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट (ICC) ने शुक्रवारी पुतीन यांच्याविरोधात युक्रेनमधील युद्ध गुन्ह्यासाठी जबाबदार धरत अटक वारंट जारी केले आहे. मात्र रशियाने या निर्णयाला निरर्थक म्हटले आहे. 

युक्रेनचे राष्ट्रपती जेलेंस्की म्हणाले की, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्याचा आंतरराष्ट्रीय क्रिमिनल कोर्टाचा निर्णय हा रशियाने केलेल्या आक्रमणा विरोधात न्याय पुनर्संचयित करण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. 

युद्धादरम्यान रशियन सैनिकांकडून युक्रेनमध्ये अत्याचार केल्याचा आरोप होत आहे. ज्याचा रशियाने अनेक वेळा खंडन केले आहे. कोर्टाने मुलांच्या अवैध निर्वासन आणि यूक्रेनच्या प्रदेशात रशियन लोकांचे अवैध स्थलांतराच्या मुद्द्यावर पुतीन यांचे अटक वारंट जारी केले आहे. न्यायालयाने रशियाच्या बाल अधिकार आयुक्त मारिया लावोवा-बेलोवा यांच्याविरुद्धही याच आरोपात अटक वारंट जारी केले आहे. रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया ज़खारोवा यांनी आपल्या टेलीग्राम चॅनलवर म्हटले की, इंटरनेशनल क्रिमिनल कोर्टाच्या निर्णयाला आमच्या देशात काही महत्व नाही. 

ट्रेंडिंग न्यूज

कोर्टाचा हा निर्णय यूएन-शासित इन्वेस्टिगेटिव बॉडीने रशियावर युक्रेनमध्ये व्यापक युद्ध अपराध  केल्याचा आरोप केल्यानंतर आला आहे. त्याचबरोबर काही प्रकरणात मुलांना आपल्या  प्रियजनांसोबत बलात्कार होताना व मृतदेह पाहणे सामील आहे. या दरम्यान रशियाने चीनसोबत आपले संबंध मजबूत करणे सुरू केले आहे. पुढच्या आठवड्यात चीनी राष्ट्रपती शी जिनपिंग  रशियाच्या दौऱ्यावर जात आहेत. यामुळे चीनचे संबंध अमेरिकेबरोबर पाश्चिमात्य देशांसोबत बिघडू शकतात. 

WhatsApp channel
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर