iPhone Contest: पैज जिंकण्यासाठी लोक कोणत्या थराला जातील, याचा काही नेम नाही. पैज आयफोन मिळवण्यासाठी असेल तर, मग काही बोलायला नको. रशियातील एका नाईट एका क्लबमध्ये अशीच एक विचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली. ही स्पर्धा जिंकणाऱ्या व्यक्तीला आयफोन बक्षीस म्हणून दिले जाणार होते. परंतु, स्पर्धा जिंकण्यासाठी क्बलमधील लोकांना आपल्या अंगावरचे कपडे काढण्याचे चॅलेंज देण्यात आले. धक्कादायक म्हणजे, आयफोनसाठी तरुणांसह तरुणींनीही हे चॅलेज स्वीकारले आणि सर्वांसमोर विविस्त्र झाल्या. या स्पर्धेला स्ट्रिपटीज असे नाव देण्यात आले आहे.
या स्पर्धेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात तीन जण स्वत:च्या अंगावरचे कपडे काढून नग्न झाल्याचे पाहायला मिळत आहे. यात एक २२ वर्षीय तरुणीचाही समावेश आहे. आयफोन मिळेल, या मोहापोटी तरुणींनी कशाचाही विचार न करता या स्पर्धेत सहभाग घेतला. याबाबत माहिती मिळताच रशियन अधिकाऱ्यांनी नाईट क्लबवर छापा टाकून चार जणांना तसेच कार्यक्रमाच्या आयोजकांना अटक केली. या स्पर्धेत सहभागी झालेल्या एका मुलीने सांगितले की, मी जे काही केले त्याबद्दल मला खूप पश्चाताप होत आहे. मी चुकीच्या गोष्टी केल्या. मी केलेल्या गोष्टींची मला खूप लाज वाटते आहे. मी सर्वांची मनापासून माफी मागतो.
या स्पर्धेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोक संतप्त झाले असून कारवाईची मागणी करू लागले आहेत. अस्त्रखान प्रदेशाचे गव्हर्नर इगोर बाबुश्किन यांनीही या स्पर्धेवर नाराजी व्यक्त केली. बंकर नाईट क्लबमध्ये जे घडले, ते आपल्या सर्वांसाठी अपमानास्पद आहे. आमचे हजारो सहकारी आणि देशबांधव आपल्या जीवाची पर्वा न करता मातृभूमीचे (युद्ध लढत) रक्षण करत आहेत. मात्र, दुसरीकडे काही लोक लज्जास्पद कृत्य करत आहे.
काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना उघडकीस आली होती. एका तरुणाने आयफोनसाठी पालकांविरोधात उपोषण सुरु केले होते, ज्याची माहिती त्याच्या चुलत भावाने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. मिळालेल्या माहितीनुसार, फुल विक्रेत्याच्या मुलाने आईकडे आयफोनची मागणी केली. परंतु, पालकांनी नकार दिल्याने त्या व्यक्तीने अन्न खाणे बंद केले. तीन दिवस काहीही न घेतल्याने, त्याच्या आईला त्याच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या आणि त्यांना आयफोन खरेदी करावा लागला. या घटनेचा एक व्हिडिओ एक्सवर शेअर करण्यात आला होता. यावर नेटकऱ्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया आल्या आहेत.