Russia Luna 25 : युक्रेनशी युद्ध सुरू असतानाच रशियाची चंद्रावर स्वारी; 'लुना २५' यान आज अवकाशात झेपवणार
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Russia Luna 25 : युक्रेनशी युद्ध सुरू असतानाच रशियाची चंद्रावर स्वारी; 'लुना २५' यान आज अवकाशात झेपवणार

Russia Luna 25 : युक्रेनशी युद्ध सुरू असतानाच रशियाची चंद्रावर स्वारी; 'लुना २५' यान आज अवकाशात झेपवणार

Aug 10, 2023 09:17 AM IST

Russia Luna 25 Mission : रशिया तब्बल ४७ वर्षानंतर चंद्रावर यानं पाठवणार आहेत. आज रशियाचे लुना २५ हे यांन चंद्रावर झेपावणार आहे.

Russia Luna 25 Mission
Russia Luna 25 Mission (AP)

Russia Luna 25 Mission: भारताच्या चंद्रयान मोहिमेनंतर आज रशियाचे लुना २५ हे यांन चंद्रावर झेपवावणार आहे. तब्बल ४७ वर्षांनी रशियाने ही मोहीम आखली आहे. शियाचं लुना २५ हे यान पाच दिवसांत चंद्राच्या कक्षेत पोहचणार आहे. त्यानंतर ते पाच ते सात दिवस चंद्राच्या कक्षेतच राहणार असून त्यानंतर दक्षिण ध्रुवावर हे यान उतरणार असल्याची माहिती रशियाची अंतराळ संस्था रॉसकॉसमॉसने दिली आहे. युक्रेन आणि रशियाच्या युद्धानंतर रशियाची ही पहिलीच मोहीम आहे. दरम्यान रशियाचे लुना २५ हे यांन भारताच्या चांद्रयान ३ साठी प्रतिस्पर्धी ठरणार आहे.

Pune Daund news : विद्यार्थी शाळा सोडून गेल्याने पुण्यात शिक्षकानं उचललं टोकाच पाऊल; संपवलं स्वतःचं आयुष्य

रशियाने प्रदीर्घ काळानंतर अवकाश मोहीम आखली आहे. रशिया, अमेरिका आणि चीन हे देश आता पर्यंत चंद्रावर पोहचण्यास यशस्वी ठरले आहे. रशियाने आता पुन्हा अवकाश मोहीम आखली असून तयांचे यांन देखील चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. भारताने चांद्रयानाचं यशस्वी प्रक्षेपण केल्यानंतर चार आठवड्यांनी रशिया हे यान आज अवकाशात पाठवणार आहे. हे यान मॉस्कोच्या पूर्वेला असलेल्या रशियाच्या स्पेसपोर्ट वरुन प्रक्षेपित करण्यात येणार आहे.

मणिपूर पेटण्याचं कारण काय? हिंसाचार रोखण्यासाठी सरकारनं काय केलं? अखेर अमित शहांनी लोकसभेत सांगितलं

दरम्यान, हे यान प्रक्षेपित झाल्यावर अवघ्या पाच दिवसांत चंद्रावर पोहचणार आहे. एक दिवस पृथ्वीला प्रदक्षिणा घातल्यावर हे यांन चंद्राच्या कक्षेत पोहचणार आहे. यानंतर चंद्राला दोन फेऱ्या मारून हे यांन सॉफ्ट लॅंडींग करणार आहे. दक्षिण धुव्रावर असणाऱ्या तीन स्पेस स्टेशनपैकी एका स्पेस स्टेशनवर हे यान उतरणार आहे. दरम्यान, ऑक्टोबर २०२१ मध्ये हे यान प्रक्षेपण होणार होते. मात्र, ही मोहीम स्थगित करण्यात आली होती.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने चांद्रयान ३ देखील २३ ऑगस्टला चंद्रावर उतरणार आहे. या यानाने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला असून २३ ऑगस्टपर्यंत हे यान चंद्रावर उतरणार आहे. रशियाचं चांद्रयान देखील याच दरम्यान चंद्रावर पोहचणार आहे. मात्र, रशियाचे यान हे चांद्रयान 3 च्या आधी चंद्रावर पोहचण्याची शक्यता असल्याने चंद्रावर सर्वात आधी कोण जाणार या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर