Russia Cancer Vaccine News in Marathi : जगात विविध दुर्धर आजार आहेत. यात कर्करोग हा गंभीर आजार असून या आजारावर कोणतेही औषध नाही. जगभरात कॅन्सरग्रस्तांची संख्या वाढत आहे. दरवर्षी लाखों नागरिक या आजाराने जीव गामावत आहे. मात्र, आता कॅन्सरवर रशियाने रामबाण उपाय शोधला आहे. नागरिकांना कॅन्सरची लागण होऊ नये यासाठी खास कॅन्सरवरील लस रशियन शास्त्रज्ञांनी तयार केली आहे. रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने या बाबत जाहीर केले असून ही लस पुढील वर्षांपासून देशातील सर्व नागरिकांना मोफत दिली जाणार आहे. रशियन सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार रशियन आरोग्य मंत्रालयाच्या रेडिओलॉजी मेडिकल रिसर्च सेंटरचे जनरल डायरेक्टर आंद्रे काप्रिन यांनी या बाबत रशियन रेडिओ चॅनेलवर माहिती दिली आहे.
जगभरातील कॅन्सर रुग्णांना दिलासा देणारी बातमी आहे. रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने कॅन्सरची लस विकसित केल्याची घोषणा केली आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला ही लस रशियन नागरिकांना मोफत दिली जाणार आहेत. ही लस कॅन्सररुग्णांना दिली जाणार नसून कॅन्सरपासून लोकांचे रक्षण करण्यासाठी याचा वापर केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. रशियाच्या आरोग्य मंत्रालयाच्या रेडिओलॉजी मेडिकल रिसर्च सेंटरचे महासंचालक आंद्रे कापरिन यांनी ही माहिती दिली. मात्र, सध्या या लसीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. उदाहरणार्थ, ही लस कोणत्या प्रकारच्या कॅन्सरवर प्रभावी ठरेल? त्याचे नाव काय असेल ?
गमालेया नॅशनल रिसर्च सेंटर फॉर एपिडेमिओलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीचे संचालक अलेक्झांडर गिंटसबर्ग यांनी रशियाच्या 'तास' या वृत्तसंस्थेला लसीबाबत माहिती देतांना सांगितले की, या लसीच्या प्री-क्लिनिकल चाचण्या करण्यात आल्या आहेत. या दरम्यान, असे आढळले आहे की ही लस ट्यूमरची वाढ आणि संभाव्य मेटास्टेसिसची वाढ होऊ डेट नाही. यापूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन म्हणाले होते की, रशियन शास्त्रज्ञ कर्करोगावर लस तयार करण्याच्या जवळ असून ती तयार झाल्यावर लवकरच ही लस नागरिकांना दिली जाणार आहे.
ही लस कोणत्या प्रकारच्या कर्करोगावर उपचार करण्यासाठी प्रभावी ठरेल याबद्दल स्पष्टता नाही. याशिवाय या लसीचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. इतरही अनेक देश अशाच लसीवर काम करत आहेत. उदाहरणार्थ, यूके सरकारने वैयक्तिकृत कर्करोगाच्या उपचारांसाठी जर्मनीस्थित बायोएनटेकशी करार केला आहे.
एआय चा वापर केला गेला का?
याआधी गिंटसबर्ग यांनी म्हटले होते की, कृत्रिम न्यूरल नेटवर्कचा वापर करून वैयक्तिकृत कर्करोगाची लस तयार करण्यासाठी लागणारा वेळ एका तासापेक्षा कमी असू शकतो. मॉडर्ना आणि मर्क अँड कंपनी या फार्मास्युटिकल कंपन्या कॅन्सरची प्रायोगिक लस बनवत आहेत. अभ्यासानुसार, तीन वर्षे या लसीने उपचार केल्यास मेलेनोमा नावाच्या धोकादायक त्वचेच्या आजाराने मृत्यू होण्याची शक्यता कमी होते.