मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  DollarVsRupees: रुपया आपटला ! आतापर्यन्तच्या सर्वाधिक खालच्या स्तरावर पोहचला; डॉलर २० वर्षातील सर्वाधिक उंचीवर

DollarVsRupees: रुपया आपटला ! आतापर्यन्तच्या सर्वाधिक खालच्या स्तरावर पोहचला; डॉलर २० वर्षातील सर्वाधिक उंचीवर

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Sep 22, 2022 02:20 PM IST

DollarVsRupees: डॉलरच्या तुलनेत गुरुवारी रुपया हा सर्वाधिक खालच्या स्तरावर पोहचला आहे. रुपया हा गुरुवारी ८०.२७ रुपयांवर खुला झाला आणि सुरवातीलाच ८०.४७ इतक्या खालच्या स्तरावर जाऊन पोहचला.

रुपया आपटला
रुपया आपटला

DollarVsRupees: डॉलरच्या तुलनेत गुरुवारी रुपया हा भयंकर आपटला. गुरुवारी सकाळी ८०.२७ ने बाजारात खुला झालेला रूपयाचे मूल्य काही वेळातच ८०.४७ इतक्या खाली पोहचला. तर डॉलर गेल्या २० वर्षात सर्वाधिक उच्चतम स्तरावर जाऊन पोहचला. बुधवारी १ डॉलरची किंमत ही ७९.८९ एवढी होती.

डॉलरच्या तुलनेत रुपया कोसळण्याचे महत्वाचे कारण म्हणजे, अमेरिकेच्या फेड द्वारे महागाई नियंत्रीत करण्यासाठी व्याज दराच्या किमान दरात तब्बल ०.७५ बेसिक पॉइंटची वाढ केली. या पूर्वी जुलै महिन्यात यूएस फेडने व्याज दरात वाढ केली होती. रुपयाची स्थिती मजबूत करण्यासाठी केंद्रीय बँकेने जुलैमध्ये १९ अरब डॉलरचे रिजर्व विकले होते. मात्र, हे पाऊल उचलूनही स्थिति ही फारशी सुधरलेली नाही.

रॉयटर्स या वृत्त संस्थेच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगणीच्या अटकवर सांगितले की, “बाजारच्या मुख्य रूपानुसार कमजोर रुपया ही खरी चिंता नाही. भारतीय अर्थव्यवस्थे साठी ही परिस्थिती मदतीची ठरणार आहे. यामुळे आयात कमी होईल आणि निर्यात वाढणार आहे. असे असले तरी भारतीय वित्त संस्थे कडून आता पर्यन्त ठोस निर्णय आलेला नाही.

जगभरातील प्रमुख चलनांमद्धे अमेरिकेच्या डॉलरचा डॉलर निर्देशांक हा ०.८८ टक्क्याने वाढून १११.६१ एवढा वाढला. कच्या जागतिक तेल मानक असलेल्या ब्रेंट क्रूड नुसार .४९ प्रतिशत बढ़कर ९०.२७ डॉलर प्रति बॅरल एवढे पोहचले होते. शेयर बाजारातील अस्थाई आकड्यानुसार विदेशी संस्थाना अंतर्गत गुंतवणूकदारांनी बुधवारी तब्बल ४६१.०४ कोटी रुपयांचे शेयर हे विकलेत.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग