Fastag Rules: सोमवारपासून म्हणजेच आजपासून फास्टॅगच्या नियमाबाबत मोठा बदल करण्यात आला आहे. जर एखाद्याचा फास्टॅग काळ्या यादीत टाकला गेला, किंवा बंद झाला किंवा कोणत्याही कारणास्तव निष्क्रिय झाला असेल तर संबंधित कारचालकाला टोल बूथ ओलांडण्यासाठी फास्टॅग हा ६० मिनिटे आधी रिचार्ज करावा लागणार आहे. टोल ओलांडल्यानंतर १० मिनिटांनीही देखील फास्टॅग रीचार्ज करण्याची सुविधा आहे. मात्र, जर वाहन वाहनचालकाने फास्टॅग अपडेट केला नाही तर त्याला दुप्पट दंड भरावा लागणार आहे.
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनने नुकतेच नवे नियम जारी केले आहेत, जे आज १७ फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत. टोलकर वसुली सोपी व्हावी व टोलनाक्यांवरील वाहतूक सुरळीत व्हावी, हा यामागचा उद्देश आहे. नियमानुसार फास्टॅग खात्यात पैसे शिल्लक न राहणे, केवायसी पूर्ण न करणे किंवा परिवहन विभागाशी वाद झाल्याने फास्टॅगला काळ्या यादीत टाकले जाऊ शकते. वाहनचालकांनी दंड टाळण्यासाठी टोल नाक्यावर पोहोचण्यापूर्वी आपल्या फास्टॅग खात्यात पुरेशी रक्कम ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
१. जर तुम्ही प्रवास करत असाल तर टोल ओलंडण्यापूर्वी एक तास आधी किंवा टोल ओलांडल्यावर १० मिनिटांपर्यंत तुम्हाला फास्टॅग रीचार्ज करता येणार आहे. मात्र, या कालावधी नंतर देखील फास्टॅग निष्क्रिय राहिल्यास तुम्हाला दुप्पट दंड भरावा लागणार आहे.
काय होईल : या परिस्थितीत खात्यातील रक्कम कमी असेल किंवा अजिबात नसेल तर गाडी टोल नाका ओलांडेल, पण फास्टॅगचा दंड म्हणून दुप्पट सुरक्षा रक्कम वसूल केली जाणार आहे. पुढच्या वेळी फास्टॅग रिचार्ज केल्यावर ही रक्कम समायोजित केली जाईल.
२. ब्लॅकलिस्ट किंवा बंद फास्टॅग रिचार्ज करण्यासाठी ड्रायव्हरला ७० मिनिटांची मुदत असेल. त्यामुळे जर एखाद्या वाहनचालकाला टोल नाके ओलांडायचे असेल तर त्याला ६० मिनिटांपूर्वी बंद असलेला फास्टॅग रिचार्ज करावा लागेल. बूथ ओलांडल्यानंतर १० मिनिटांनंतरही तो हे काम करू शकतो, पण त्याचवेळी केवायसी प्रक्रियाही पुन्हा पूर्ण करावी लागणार आहे.
३. नियमांकडे दुर्लक्ष केल्यास चालकाला दुप्पट दंड भरावा लागेल. दुचाकी वगळता सर्व प्रकारच्या वाहनांना फास्टॅग लावणे बंधनकारक आहे. फास्टॅग निष्क्रिय किंवा बंद असल्यास वाहनचालक रोख रक्कम भरून टोल नाक्याचा वापर करू शकतात. मात्र, त्यासाठी सामान्य टोल शुल्कापेक्षा दुप्पट टोल आकारला जाणार आहे.
- खात्यात थोडी रक्कम असेल तर
- केवायसीची डेडलाइन संपल्यावर
- वाहनाशी संबंधित कायदेशीर वाद झाले असल्यास
- जोपर्यंत वाद मिटत नाही, तोपर्यंत टोल बूथ ब्लॅकलिस्ट टॅग वापरता येणार नाही.
- नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनच्या (https://www.npci.org.in/) वेबसाईटवर जा. होमपेजवरील एनईटीसी फास्टॅग पर्यायावर क्लिक करा.
- नवीन पेजच्या खाली एनईटीसी फास्टॅग स्टेटस ऑप्शनवर क्लिक करा. पुढील पानावर वाहन नोंदणी क्रमांक टाका.
- त्यानंतर कॅप्चा टाका आणि चेक स्टेटस बटण दाबा. यामुळे वाहन फास्टॅगच्या काळ्या यादीत आहे की नाही हे स्पष्ट होईल.
- या वेबसाईटवर रिचार्ज करण्याचा पर्यायही देण्यात आला आहे.
- कमीत कमी रक्कम भरून त्याची पडताळणी करा. केवायसी प्रक्रिया पूर्ण करा.
- थोड्याच वेळात तुमचा फास्टॅग पुन्हा अॅक्टिव्हेट होईल.
संबंधित बातम्या