रघुपती राघव राजाराम भजनावर आक्षेप, ईश्वर-अल्लाह तेरो नाम ओळ येताच भडकले लोक; गायिकेने मागितली माफी
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  रघुपती राघव राजाराम भजनावर आक्षेप, ईश्वर-अल्लाह तेरो नाम ओळ येताच भडकले लोक; गायिकेने मागितली माफी

रघुपती राघव राजाराम भजनावर आक्षेप, ईश्वर-अल्लाह तेरो नाम ओळ येताच भडकले लोक; गायिकेने मागितली माफी

Dec 26, 2024 06:53 PM IST

Main Atal Rahunga Event: पाटण्यातील बापू सभागृहात 'मैं अटल राहुंगा' या कार्यक्रमात रघुपती राघव राजा राम भजनावर आक्षेप घेण्यात आला.

रघुपती राघव राजा राम भजनावर आक्षेप
रघुपती राघव राजा राम भजनावर आक्षेप

Patna News: 'रघुपती राघव राजा राम भजन'वरून झालेल्या गदारोळानंतर प्रसिद्ध गायिका देवी यांना पाटण्यातील एका कार्यक्रमात उपस्थित लोकांची माफी मागावी लागली. तसेच त्यांना जय श्री रामचा नारा द्यावा लागला. या घटनेनंतर देशातील राजकारण ठिणगी पडली असून विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पाटण्यातील बापू सभागृहात 'मैं अटल राहुंगा' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गायिका देवी यांनाही या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले. या कार्यक्रमात देवी यांनी 'भारत माता की जय' आणि 'अटल बिहारी वाजपेयी अमर रहे'च्या घोषणा दिल्या. यानंतर त्यांनी रघुपती राघव राजा राम हे भजन गायले गायले. पंरतु,या भजनातील ईश्वर-अल्लाह तेरो नाम ओळ येताच कार्यक्रमात उपस्थित काही लोकांनी आरडाओरडा सुरू केला.

यानंतर देवी यांनी लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. तसेच देव आपल्या सर्वांचा आहे आणि केवळ रामाचे स्मरण करणे हा त्यांचा उद्देश होता, असे त्यांन स्पष्ट केले. मात्र,त्याचा काहीही परिणाम झाला नाही. यानंतर आयोजकांनी मध्यस्ती करून सर्वांना शांत केले. यावेळी गायिका देवी यांनी या भजनात दुखावण्यासारखे काहीही नाही, असे म्हटले. पण तरीही ज्यांची मन दुखावली गेली आहेत, त्यांची मी माफी मागते, असे त्या म्हणाल्या. यानंतर त्यांनी शारदा सिन्हा यांचे गाणे गायले आणि मग त्या कार्यक्रमातून निघून गेल्या.

लालू प्रसाद यादव यांनी व्यक्त केली नाराजी

राजद नेते लालू प्रसाद यादव यांनी या घटनेवर नाराजी व्यक्त केली. लालू प्रसाद यादव म्हणाले की,' पाटणातील एका कार्यक्रमात गायिकने महात्मा गांधीजींचे आवडते भजन रघुपती राघव राजा राम हे भजन गायल्यानंतर नितीश कुमार यांच्या समर्थकांनी सभागृहात गोंधळ घातला. मात्र, यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या असून भजन गायिका देवी यांना देखील माफी मागावी लागली.'

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर