मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Mohan Bhagwat: मोहन भागवत ‘राष्ट्रपिता’ व ‘राष्ट्रऋषी’; मशिदीतील भेटीनंतर मुख्य इमामांना साक्षात्कार

Mohan Bhagwat: मोहन भागवत ‘राष्ट्रपिता’ व ‘राष्ट्रऋषी’; मशिदीतील भेटीनंतर मुख्य इमामांना साक्षात्कार

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Sep 22, 2022 10:42 PM IST

मोहन भागवत यांनी मशिदीला भेट देऊन तासभर चर्चा केल्यानंतर उमर अहमद इलयासी यांनी त्यांचा उल्लेख ‘राष्ट्रपिता’ म्हणून केल्याने उलट-सुलट चर्चा रंगल्या आहेत.मोहन भागवत यांच्या मशीद भेटीनंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे.

मशिदीतील भेटीनंतर मुख्य इमामांचे सरसंघचालकांबद्दल गौरवोद्गार
मशिदीतील भेटीनंतर मुख्य इमामांचे सरसंघचालकांबद्दल गौरवोद्गार

नवी दिल्ली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Rss chief mohan bhagwat) यांनी आज दिल्लीतील एका मशिदीला भेट दिली. यावेळी त्यांनी तेथील प्रमुख मुस्लिम नेत्यांशी चर्चा केली. भागवत यांनी यावेळी ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे प्रमुख उमर अहमद इलयासी यांचीही भेट घेऊन जवळपास तासभर चर्चा केली. मोहन भागवत यांनी मशिदीला भेट देऊन तासभर चर्चा केल्यानंतर उमर अहमद इलयासी यांनी त्यांचा उल्लेख ‘राष्ट्रपिता’ म्हणून केल्याने उलट-सुलट चर्चा रंगल्या आहेत. मोहन भागवत यांच्या मशीद भेटीनंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे.

मोहन भागवत यांच्यासोबतच्या भेटीनंतर उमर अहमद इलयासी यांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा केली. यावेळी इलयासी यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांचा राष्ट्रपिता म्हणून उल्लेख केला. त्याशिवाय दोन्ही धर्मियांचा डीएनए एकच असल्याचेही इमाम म्हणाले.

यावेळी इलयासी म्हणाले की, मोहन भागवत यांना मी निमंत्रण दिले होते. माझ्या निमंत्रणानंतर ते मशिदीला भेट देण्यासाठी आले होते. ते राष्ट्रपिता आणि राष्ट्रऋषी आहेत. त्यांच्या भेटीनंतर समाजात एक चांगला संदेश जाईल. प्रत्येक धर्मियांच्या देवाचे पूजन करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. मात्र मानवता हा सर्वात मोठा धर्म आहे. देश सर्वप्रथम याला आम्ही महत्त्व देतो,” असे उमर अहमद इलयासी म्हणाले आहेत.

सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्गावरील एका मशिदीला आज भेट दिली. या भेटीमध्ये त्यांनी काही लोकांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे प्रमुख उमर अहमद इलयासी यांची भेट घेत साधारण एक तास चर्चा केली.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे माजी कुलगुरु लेफ्टनंट जनरल (सेवानिवृत्त) जमीरुद्दीन शाह, माजी खासदार शाहिद सिद्दीकी आणि परोपकारी सईद शेरवानी यांची आरएसएसच्या कार्यालयात झालेल्या बैठकीला हजेरी लावली होती. मोहन भागवत यांच्यासोबत त्यांची तब्बल दोन तास चर्चा झाली होती. सांप्रदायिक सलोखा मजबूत करणे आणि दोन्ही समाजाचे संबंध सुधारण्यावर व्यापक चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या