दोन किंवा तीन मुले जन्माला घाला! अन्यथा मानवता धोक्यात येईल; मोहन भागवत यांचं मोठं विधान
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  दोन किंवा तीन मुले जन्माला घाला! अन्यथा मानवता धोक्यात येईल; मोहन भागवत यांचं मोठं विधान

दोन किंवा तीन मुले जन्माला घाला! अन्यथा मानवता धोक्यात येईल; मोहन भागवत यांचं मोठं विधान

Dec 01, 2024 03:08 PM IST

Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी लोकसंख्या धोरणाबाबत एक मोठं विधान केलं आहे. लोकसंख्येचा सरासरी वाढीचा दर २.१ टक्क्यांच्या खाली येऊ नये, हे महत्त्वाचे आहे, असे भागवत म्हणाले. त्यामुळे दोन-तीन मुलं असणं गरजेचं आहे, असे भागवत म्हणाले.

दोन किंवा तीन मुले जन्माला घाला! अन्यथा मानवता धोक्यात येईल; मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य
दोन किंवा तीन मुले जन्माला घाला! अन्यथा मानवता धोक्यात येईल; मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य (Snehal Sontakke)

Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी लोकसंख्या धोरणाबाबत एक महत्त्वाचं विधान केलं आहे. लोकसंख्येचा सरासरी वाढीचा दर २.१ टक्क्यांच्या खाली येऊ नये, यासाठी खबरदारी घ्यायला हवी. त्यामुळे दोन-तीन मुलं असणं गरजेचं आहे. लोकसंख्या विज्ञान हेच सांगतं. जर जन्मदारांचे सरासरी प्रमाण २.१ असेल तर मानवजातीचं अस्तित्व धोक्यात येवू शकतं.  लोकसंख्या कमी होण्याचे प्रमाण असचं राहिल्यास अनेक भाषा, धर्म आणि संस्कृती नामशेष होतील असे, भागवत म्हणाले. 

नागपूर येथील एका कार्यक्रमात बोलतांना मोहन भागवत म्हणाले, 'लोकसंख्या घट ही चिंतेची बाब आहे. आधुनिक लोकसंख्या विज्ञान सांगतं की जेव्हा जन्मदर २.१ च्या खाली येतो तेव्हा पृथ्वीवरून माणुसकी नष्ट होण्याचा धोका अधिक असतो. अशा परिस्थितीत समाज नष्ट होण्याच्या मार्गावर असतो. ही परिस्थितीत उद्भवल्यास अनेक भाषा,  संस्कृती संपुष्टात येण्याचा धोका निर्माण होतो. देशाचे लोकसंख्या धोरण १९९८ किंवा २००२ मध्ये ठरविण्यात आले. लोकसंख्येचा सरासरी वाढीचा दर २.१ पेक्षा कमी नसावा. आमच्यासाठी दोन-तीन मुलं असणं गरजेचं आहे. लोकसंख्येची गरज आहे.  कारण समाजाचे अस्तित्व राखण्यासाठी हे गरजेचे आहे.  

मोहन भागवत म्हणाले, लोकसंख्येचा असमतोल वाढत चालला आहे. या बाबत अनेक वेळा  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुरुच्चार केला आहे.  मोहन भागवत यांनी भारतातील हिंदू लोकसंख्येच्या घटत्या टक्केवारीबद्दल अनेकदा चिंता व्यक्त केली आहे. भारतात हिंदू बहुसंख्य राहिले पाहिजेत आणि त्यामुळे देशाची मूल्ये सुरक्षित आहेत, असा युक्तिवाद देखील भागवत यांनी केला आहे.

 स्वातंत्र्यानंतर मुस्लीम लोकसंख्येची टक्केवारी वाढली आहे, तर हिंदू लोकसंख्येची टक्केवारी ८० टक्क्यांच्या जवळपास आली आहे, जी एकेकाळी ८८ टक्क्यांच्या आसपास होती, असे अनेक अहवालात म्हटले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर