Mahadev betting app : दुबईत बसून चालवायचा सट्टा बाजार; लग्नात २०० कोटी उधळल्यावर ED चौकशी
Mahadev betting app promoter under ED scanner: दुबईत लग्नात तब्बल २०० कोटी रोख स्वरूपात उधळणाऱ्या महादेव बेटींग अॅप् च्या मालकावर ईडीने आपला फास आवळला आहे.
Mahadev betting app promoter : महादेव बेटींग अॅप् चा प्रमुख असलेला सौरभ चंद्राकरने त्याच्या लग्नात तब्बल २०० कोटी रुपये उधळल्याने तो ईडीच्या रडारवर आला आहे. त्याने यूएईच्या रास अल खैमाह येथे शाही विवाह केला. या साठी त्याने कुटुंबीयांना नागपूरहून यूएईला नेण्यासाठी खाजगी जेट भाड्याने घेतले. एवढेच नाही तर काही सीनेतारकांना देखील लग्नात नाचववण्यासाठी पैसे दिले. ईडीने त्याच्या मालमत्तेवर छापे टाकले असून तब्बल ४५० कोटींपेक्षा अधिक मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
महादेव ऑनलाइन बुक बेटिंग अॅप हे बेकायदेशीर बेटिंग वेबसाइट आहे. या वेबसाईटच्या प्रमुखांपैकी एक असलेला सौरभ चंद्राकर याचे नुकतेच लग्न झाले. त्याने शाही पद्धतीने यूएईमध्ये त्याचे लग्न केले. या लग्नासाठी त्याने रोखीने व्यवहार केला असून या साठी हवालाचा वापर केल्याचा ईडीचा आरोप आहे. तब्बल २०० कोटी रुपये त्याने लग्नावर उडवल्याने ईडीने त्याच्याभोवती आणि या अॅपशी संबंधित इतर अनेकांच्या मालमत्तावर छापेमारी करण्यात आली. यात मोठी मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.
ईडीने म्हटले आहे की चंद्रकर आणि रवी उप्पल हे दोघे मूळचे छत्तीसगडमधील भिलाईचे आहेत. महादेव सट्टेबाजी प्लॅटफॉर्मचे ते मुख्य संस्थापक आहेत. हे अॅप दुबईतून चालवले जात असून भारतात देखील मोठे जाळे निर्माण करण्यात आले आहे. ईडीने या अॅपशी संबंधित रायपूर, भोपाळ, मुंबई आणि कोलकाता येथील तब्बल ३९ ठिकाणी धाडी टाकल्या. यात ४५० कोटी रुपयांची अवैध मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. परदेशातही ईडी तपास मोहीम राबवित आहे.
रायपूर येथील प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँडरिंग ऍक्ट (PMLA) विशेष न्यायालयाने संशयितांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. महादेव ऑनलाइन बुक अॅपच्या संदर्भात मनी लाँड्रिंगच्या आरोपांची चौकशी करणार्या ईडीने गेल्या महिन्यात छत्तीसगडमध्ये देखील छापेमारी केली होती. सट्टेबाजीच्या सिंडिकेटच्या मुख्य संपर्ककर्त्यासह चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी कारवाई टाळण्यासाठी अधिकाऱ्यांना प्रोटेक्शन मनी म्हणून दिल्याचे तपासात उघड झाले आहे. महादेव ऑनलाइन अॅपहे UAE मधील मध्यवर्ती मुख्य कार्यालयातून चालवले जाते. वेबसाइट्सच्या जाहिरातीसाठी आणि स्वत: ची भव्यता यासाठी भारतात मोठ्या प्रमाणात रोख खर्च केला जात असल्याचे, ईडीने सांगितले.
ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेनुसार, ११२ कोटी रुपये हवाला चॅनलद्वारे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी - योगेश पोपट यांच्या आर-१ इव्हेंट्स प्रायव्हेट लिमिटेडला वितरित केले गेले तर ४२ कोटी रुपयांचे हॉटेल बुकिंग पेमेंट करण्यात आले. तर अरब अमिराती दिरहाम मध्ये रोख व्यवहार करण्यात आले.
ईडीने योगेश पोपट, मिथिलेश आणि इतर संबंधितांवर देखील छापे टाकले. योगेश पोपट याच्या नावावर असलेल्या मालमत्तेचा शोध अधिकाऱ्यांनी घेतला आहे. या कारवाईत २.३७ कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली आहे. या सट्टेबाजीत अनेक अभिनेते देखील सहभागी असल्याचे आढळून येत आहे. जाहिरातीसाठी त्यांना रोख स्वरूपात पैसे दिल्या जात आहे. महादेव अॅप प्रवर्तक या कंपनीद्वारे लग्नासाठी कुटुंबीयांना आणि सेलिब्रिटी यांचे विमान तिकीटे काढण्यात आले. सट्टेबाजीतून मिळणारी रक्कम ही चोरून आंतरराष्ट्रीय तिकिटे बुक करण्यासाठी वापरली गेली. रॅपिड ट्रॅव्हल्सने सप्टेंबर महिन्यात यूएईमध्ये आयोजित केलेल्या वार्षिक स्टार-स्टडेड इव्हेंटसह महादेव समूहाच्या बहुतेक कार्यक्रमांसाठी प्रवासाची व्यवस्था करण्यात प्रमुख भूमिका बजावली असे ईडीने सांगितले.
तपासादरम्यान असे आढळून आले की कोलकाता येथील विकास छापरिया हा महादेव अॅपसाठी हवालाशी संबंधित सर्व व्यवहार हाताळत होता. ईडीने त्याच्या ओळखीच्या परिसरात आणि त्याचा सहकारी गोविंद केडिया याच्या घराची झडती घेतली. गोविंद केडियाच्या मदतीने विकास चपरिया त्यांच्या संस्थांद्वारे - परफेक्ट प्लॅन इन्व्हेस्टमेंट्स एलएलपी, एक्झिम जनरल ट्रेडिंग एफझेडसीओ आणि टेकप्रो आयटी सोल्यूशन्स एलएलसी - विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूक (FPI) मार्गाने भारतीय शेअर बाजारात मोठी गुंतवणूक देखील केली. विकास छापरियाच्या फायद्याच्या मालकीच्या संस्थांच्या नावावर रोख डेरिव्हेटिव्ह्ज आणि इतर सुरक्षा होल्डिंग्ससाठी २३६ कोटी रुपये ED ने PMLA 2002 अंतर्गत गोठवले आहेत. गोविंद कुमार केडिया यांच्या घराच्या झडतीत १८ लाख रुपयांची भारतीय रोख रक्कम, सोने आणि १३ कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले.
विभाग