Bengaluru School Viral News: खाजगी अवाजवी फी आकारली जात असल्याच्या अनेक बातम्या ऐकायला मिळतात. अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे, जी पाहून अनेकांना धक्का बसला आहे. बंगळुरू येथील एका खाजगी शाळेत इयत्ता तिसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची फी पाहिल्यानंतर पालकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अशा अवाजवी फीमुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
व्हॉइस ऑफ पॅरेंट्स असोसिएशनने ट्विटरवर एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये इयत्ता तिसरीची फी चक्क दोन लाख रुपयांपेक्षा जास्त असल्याचा उल्लेख केला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, बंगळुरूत इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची फी २.१ लाख रुपये इतकी आहे. कोणत्याही प्रकारची महागाई या शुल्काचे समर्थन करू शकत नाही. सरकार अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या शुल्कावर नियंत्रण ठेवते. परंतु, शाळेच्या शुल्काचा मुद्दा टाळला जातो. शालेय व्यवसायासारखा कोणताही व्यवसाय नाही.
व्हॉइस ऑफ पॅरेंट्स असोसिएशन या विरोधात निषेध करत आहे, शिक्षणाला व्यवसायात रूपांतरित करण्याविरुद्ध आणि नफेखोरांवर कारवाई करण्याची मागणी करत आहे. त्यांनी संविधानाच्या कलम २९, ३० आणि १९(१)(जी) अंतर्गत शाळा व्यवस्थापित करण्याचे आणि चालवण्याचे अधिकाराचा हवाला देत शाळा व्यवस्थापनांना त्यांच्या अधिकारांचा गैरवापर करण्याची परवानगी नाही, असे म्हटले आहे. शाळांनी अशा चुकीच्या पद्धती थांबवाव्यात यासाठी कठोर नियम लागू करावेत, फी निश्चिती समित्या स्थापन कराव्यात आणि पारदर्शक देखरेख करावी, असे आवाहन असोसिएशनने सरकारला केले.
व्हायरल पोस्टमुळे शिक्षणाबाबत उलट सुलट सुरू झाली आहे. या पोस्टवर कमेंट करताना एका युजरने म्हटले आहे की, 'चांगल्या पायाभूत सुविधांसह शाळा चालवणे महाग आहे. शुल्कावर बंदी घालण्याचे नकारात्मक परिणाम होऊ शकतात. चांगल्या सरकारी शाळा उघडणे हाच सर्वोत्तम उपाय आहे.' दुसऱ्या युजरने म्हटले आहे की, 'जर विशेषाधिकारप्राप्त लोकांनी सरकारी शाळा निवडल्या तर त्यांची रचना आपोआप सुधारेल. सर्वांना मोफत आणि चांगले शिक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे.' काही वापरकर्त्यांनी उच्च शुल्काचे कारण म्हणून प्रीमियम आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमाचा उल्लेख केला.
संबंधित बातम्या