Trending News: भारतात १०० रुपयालाही विकली जात नाही, त्या चपलेसाठी सौदी अरेबियात मोजले जातात लाख रुपये? पाहा व्हिडिओ
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Trending News: भारतात १०० रुपयालाही विकली जात नाही, त्या चपलेसाठी सौदी अरेबियात मोजले जातात लाख रुपये? पाहा व्हिडिओ

Trending News: भारतात १०० रुपयालाही विकली जात नाही, त्या चपलेसाठी सौदी अरेबियात मोजले जातात लाख रुपये? पाहा व्हिडिओ

Published Jul 17, 2024 03:17 PM IST

Saudi Arabia Chappal Video: महागड्या किमतीत या चप्पल विकल्या जात असल्याच्या व्हिडिओमुळे लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

सौदी अरेबियामध्ये १००००० रुपयांपेक्षा जास्त किमतीत चप्पल विकल्या जात आहेत.
सौदी अरेबियामध्ये १००००० रुपयांपेक्षा जास्त किमतीत चप्पल विकल्या जात आहेत.

Viral News: आलिशान घर किंवा जमीनीची चढ्या किंमतीत विक्री केली जात असल्याचे आपण अनेकदा पाहिले. पण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. या व्हिडिओत भारतात १०० रुपयांत खरेदी केली जाणारी चप्पलची सौदी अरेबियात चक्क १ लाख रुपयांना विक्री केली जात आहे.  हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत.

ऋषी बागे या हँडलने एक्सवर या चप्पल दाखवणारा व्हिडिओ शेअर केला आहे. शेअर करताना त्याने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, "आम्ही भारतीय या चप्पलचा टॉयलेटमध्ये जाण्यासाठी वापर करतो, ज्याची सौदी अरेबियात लाख रुपयांना विक्री केली जात आहे.” व्हिडिओमध्ये एक व्यक्ती काचेच्या डब्याच्या आतून ही चप्पल बाहेर काढताना दिसत आहे. त्यानंतर चप्पल किती लवचिक आणि आरामदायक आहेत हे तो दाखवतो. या क्लिपमध्ये तुम्ही पाहू शकता की, चप्पल आणखी दोन रंगांमध्ये विकली जात आहेत.

ही पोस्ट १६ जुलै रोजी शेअर करण्यात आली होती. पोस्ट केल्यापासून त्याला जवळपास २० लाख व्ह्यूज मिळाले आहेत. या शेअरवर असंख्य लाईक्स आणि कमेंट्सही आहेत. या चप्पलांच्या चढ्या किमती पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. तर, काहींनी भारतीयांसाठी व्यवसायाची ही चांगली संधी ठरू शकते, असे म्हटले आहे.  मात्र, या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

नेटकऱ्यांनी दिली अशी प्रतिक्रिया

एका व्यक्तीने म्हटले की, "भारतीयांनी या संधीचा फायदा घेत येथे १०० रुपयात चप्पल खरेदी करावी आणि ४५०० रियाल म्हणजेच १ लाखात सौदी अरेबियात विक्री करावी. फैज नावाच्या आणखी एका एक्स युजरने लिहिले की, जेव्हा तुमच्याकडे खूप पैसे असतात, तेव्हा तुम्ही एका गोष्टीसाठी हजारो रुपये मोजता. भारतीय चप्पल उत्पादकांसाठी ही व्यवसायाची संधी आहे, अशी प्रतिक्रिया एक्स युजर शुभम वर्मा ने दिली आहे. चौथ्या पोस्टमध्ये लिहिले की, "मला आठवते की जेव्हा माझ्या वडिलांनी मला नवीन जोडी आणयचे, तेव्हा मला किती आनंद व्हायचा. मी त्यांची खूप चांगली देखभाल करायचो. त्यांना रिन साबणाने स्वच्छ केल्याने ते पांढरे राहण्यास मदत होते. एकेकाळी आयुष्य साधे होते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर