Railway Jobs News in Marathi : रेल्वे भरती बोर्डानं आजपासून ३२ हजारहून अधिक रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. नोकरीसाठी इच्छुक उमेदवार आरआरबीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ फेब्रुवारी २०२५ ही आहे. याशिवाय २३ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी २०२५ या अर्ज शुल्क भरून नोंदणी करण्याची मुभा देण्यात आली आहे.
अर्जात सुधारणा करण्यासाठी २५ फेब्रुवारी ते ६ मार्च २०२५ ही मुदत देण्यात आली आहे. उमेदवारांना ५०० रुपये परीक्षा शुल्क भरावं लागणार आहे. कम्प्युटर आधारित चाचणीला (CBT - Computer Based Test) दिल्यास आवश्यकतेनुसार बँक शुल्क कापून उरलेली ४०० रुपयांची रक्कम योग्य वेळी परत केली जाणार आहे.
> दिव्यांग / महिला / तृतीयपंथी / माजी सैनिक उमेदवार आणि एससी / एसटी / अल्पसंख्याक समुदाय / आर्थिक मागास प्रवर्ग (EBC) मधील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क २५० रुपये आहे. बँक शुल्क वजा करून योग्य वेळी ते परत केले जाईल.
> शुल्क हे इंटरनेट बँकिंग, डेबिट/क्रेडिट कार्ड, यूपीआय आदींद्वारे भरावे.
> सीईएन क्रमांक ०८/२०२४ अंतर्गत आरआरबीनं जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, भरती मोहिमेत ७ व्या सीपीसी पे मॅट्रिक्सच्या लेव्हल १ मध्ये ३२४३८ विविध पदे भरली जातील.
> अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय १ जानेवारी २०२५ रोजी १८ ते ३६ वर्षे असावं.
आरआरबी भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार खालील प्रक्रिया पूर्ण करावी.
> आरआरबीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
> मुख्य पृष्ठावर, सीईएन क्रमांक ०८/२०२४ अंतर्गत आरआरबी भरतीसाठी अर्ज करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
> लॉग इन करण्यासाठी आणि सबमिट करण्यासाठी आपले क्रेडेन्शियल्स प्रविष्ट करा.
> अर्ज भरा, अर्ज शुल्क भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
> पुष्टी पृष्ठ सबमिट करा आणि डाउनलोड करा.
> भविष्यातील संदर्भासाठी पुष्टी पृष्ठाची प्रिंटआउट ठेवा.
> अधिक संबंधित माहितीसाठी, उमेदवारांनी सविस्तर अधिसूचना वाचावी.
संबंधित बातम्या