RRB Recruitment: रेल्वे भरती मंडळात विविध पदांसाठी भरती सुरू, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख!-rrb ntpc ug recruitment 2024 registration for 3445 posts begins today ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  RRB Recruitment: रेल्वे भरती मंडळात विविध पदांसाठी भरती सुरू, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख!

RRB Recruitment: रेल्वे भरती मंडळात विविध पदांसाठी भरती सुरू, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख!

Sep 24, 2024 06:13 PM IST

RRB NTPC UG Recruitment: रेल्वे भरती मंडळात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती अंतर्गत ३ हजारांहून अधिक जागा भरल्या जाणार आहेत.

रेल्वे भरती मंडळात विविध पदांसाठी भरती सुरू
रेल्वे भरती मंडळात विविध पदांसाठी भरती सुरू

RRB NTPC UG Recruitment 2024: भारतीय रेल्वेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. भारतीय रेल्वे भरती मंडळात विविध पदांसाठी अर्ज मागिवले जात आहेत. या भरती अंतर्गत ३ हजारांपेक्षा अधिक जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी २१ सप्टेंबर २०२४ पासून नोंदणी सुरू झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊयात.

या भरती मोहिमेत संस्थेतील ३४४५ पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीमध्ये कमर्शियल कम तिकीट क्लर्क, अकाउंट क्लार्क कम टंकलेखक, कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक आणि ट्रेन क्लर्क या पदांचा समावेश आहे.  या पदांसाठी इच्छुक असलेले उमेदवारांना २० ऑक्टोबर २०२४ पर्यंत अर्ज करायचा आहे. त्यानंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे.

रिक्त जागांचा तपशील

  • कमर्शियल कम तिकीट क्लर्क: २ हजार २२ जागा
  • अकाउंट क्लार्क कम टंकलेखक: ३६१ जागा
  • कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक: ९९० जागा
  • ट्रेन क्लर्क: ७२ जागा

 

अर्ज शुल्क

आरआरबी एनटीपीसी अर्ज शुल्क एससी, एसटी, माजी सैनिक, महिला, पीडब्ल्यूबीडी, ट्रान्सजेंडर, अल्पसंख्याक आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (ईबीसी) प्रवर्गातील उमेदवारांसाठी २५० रुपये आहे. इतर सर्व अर्जांसाठी ५०० रुपये शुल्क आहे. कॉम्प्युटर बेस्ड टेस्टसाठी बसताना उमेदवार अर्ज शुल्काचा अंशत: परतावा मिळण्यास पात्र असतील. अधिक संबंधित तपशीलांसाठी उमेदवार आरआरबीची अधिकृत वेबसाइट पाहू शकतात.

 

अर्ज कसा करायचा?

  • सर्वप्रथम, आरआरबीच्या अधिकृत वेबसाइट rrbapply.gov.in येथे भेट द्यावी.
  • नंतर होम पेजवर उपलब्ध आरआरबी एनटीपीसी यूजी भरती २०२४ येथे क्लिक करा.
  • एक नवीन पेज उघडेल जिथे उमेदवारांना खाते तयार करावे लागेल.
  • खाते तयार करून झाल्यानंतर लॉगिन करा.
  • पुढे, भरती अर्ज दिसेल तो व्यवस्थित वाचून भरावा. नंतर अर्ज शुल्क भरा.
  • त्यानंतर सबमिटवर क्लिक करा.
  • पुढील गरजेसाठी भरलेल्या फॉर्मची हार्ड कॉपी ठेवा.

 

महत्त्वाची माहिती

उमेदवारांकडे स्वतःचा मोबाइल नंबर आणि वैध आणि सक्रिय वैयक्तिक ईमेल आयडी असणे गरजेचे आहे. भरतीच्या संपूर्ण कालावधीसाठी आपला मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी सक्रिय ठेवणे आवश्यक आहे. कारण उमेदवारांना भरती प्रक्रियेशी माहिती अपडेट्स एसएमएस किंवा इमेलद्वारे पाठवली जाईल.

 

Whats_app_banner