बेरोजगारांना खूशखबर! रेल्वे ग्रुप डी भरतीसाठी आता ITI बंधनकारक नाही! १० वी पास देखील करू शकणार अर्ज
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  बेरोजगारांना खूशखबर! रेल्वे ग्रुप डी भरतीसाठी आता ITI बंधनकारक नाही! १० वी पास देखील करू शकणार अर्ज

बेरोजगारांना खूशखबर! रेल्वे ग्रुप डी भरतीसाठी आता ITI बंधनकारक नाही! १० वी पास देखील करू शकणार अर्ज

Jan 04, 2025 11:36 AM IST

RRB Group D Eligibility Criteria: आरआरबी ग्रुप डी भरती २०२५ साठी आता १० वी उत्तीर्ण असणारे तरुण सुद्धा अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी आयटीआय करणे बंधनकारक ठेवण्यात आलेले नाही.

बेरोजगारांसाठी खुशखबर! रेल्वे ग्रुप डी भरतीत आता आयटीआय बंधनकारक नाही; १० वी पास असलेल्यांना देखील करता येणार अर्ज
बेरोजगारांसाठी खुशखबर! रेल्वे ग्रुप डी भरतीत आता आयटीआय बंधनकारक नाही; १० वी पास असलेल्यांना देखील करता येणार अर्ज

RRB Group D Eligibility Criteria: रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाने ग्रुप डी (लेव्हल -१) पदांच्या भरतीसाठी किमान शैक्षणिक पात्रतेचे निकष शिथिल केले आहेत. नव्या निकषांनुसार आता दहावी उत्तीर्ण उमेदवारांना सुद्धा  ग्रुप डी पदांच्या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. ग्रुप डी भरतीसाठी आयटीआय डिप्लोमा यापुढे अनिवार्य राहणार नाही. यापूर्वी तांत्रिक विभागांसाठी अर्ज करण्यासाठी दहावी उत्तीर्ण असणे आणि नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंगकडून (एनसीव्हीटी) एनएसी किंवा आयटीआय डिप्लोमा असणे अनिवार्य होते. नॅक किंवा आयटीआय पदविका नसलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकत नव्हते.

रेल्वे बोर्डाने २ जानेवारी रोजी सर्व रेल्वे झोनला पाठवलेल्या लेखी सूचनांमध्ये म्हटले आहे की, या प्रकरणाचा आढावा घेतल्यानंतर आधीच्या सूचनांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या नियमांनुसार उमेदवाराकडे कोणताही डिप्लोमा नसला तरी आणि तो दहावी पास असला तरी त्याला आता या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.  

रेल्वे ग्रुप डी १ पदासाठी २३ जानेवारी पासून करता येणार अर्ज 

रेल्वे लेव्हल -१  पदांच्या सुमारे ३२००० पदांची भरती केली जाणार आहे. या साठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. ही अर्ज  प्रक्रिया २३  जानेवारी २०२५  पासून सुरू होईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ फेब्रुवारी २०२५  आहे. त्यानुसार उमेदवाराचे वय ०१  जुलै २०२५ पासून ग्राह्य धरले जाणार आहे.  या भरतीची संक्षिप्त सूचना (सेंट्रलाइज्ड एम्प्लॉयमेंट नोटिफिकेशन (सीईएन) क्र. 08/2024) भारत सरकारच्या एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. आरआरबी ग्रुप डी परीक्षा सीबीटी मोडमध्ये घेतली जाणार आहे.  

गेल्या काही महिन्यांतील विविध रेल्वे भरतीप्रमाणेच ‘गट ड’ भरतीच्या नोटिशीतही कमाल वयोमर्यादेत तीन वर्षांची सूट देण्यात आली आहे. कोविड महामारीमुळे 'गट ड; भरतीची कमाल वयोमर्यादा तीन वर्षांनी शिथिल करण्यात आली आहे. कमाल वयोमर्यादा ३३ ऐवजी ३६ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. ही सवलत केवळ एकदाच असल्याचे ही सांगण्यात आले आहे.

जनरल/ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ५०० रुपये आहे (सीबीटीमध्ये बसण्यासाठी ४००  रुपये परत केले जातील) आणि एससी / एसटी / ईबीसी / महिला / तृतीयपंथी साठी२५०  रुपये (सीबीटीमध्ये उपस्थित राहिल्यावर संपूर्ण शुल्क परत केले जाईल).

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर