RRB calender 2024 : रेल्वे भर्ती बोर्डाने या वर्षीच्या रेल्वे भरती भरती परीक्षांचे (RRB) कॅलेंडर प्रसिद्ध केले आहे. रेल्वेने एसएससी आणि यूपीएससी प्रमाणे वार्षिक भरती कॅलेंडर (RRB calender 2024) जाहीर करावे, अशी दीर्घ मागणी उमेदवारांनी केली होती. त्यानुसार रेल्वेने हे कॅलेंडर रेल्वेने प्रसिद्ध केले असून यात वर्षभरात घेण्यात येणाऱ्या परीक्षांची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
रेल्वे भरती कॅलेंडर २०२४ नुसार, असिस्टंट लोको पायलट (ALP) ची भरती जानेवारी-मार्च दरम्यान घेतली जाणार आहे. एप्रिल ते जून या कालावधीत तंत्रज्ञ पदांसाठी भरती होणार आहे. यानंतर, जुलै-सप्टेंबरमध्ये, नॉन-टेक्निकल लोकप्रिय श्रेणी NTPC पदवी स्तर ४, ५, ६ आणि पॅन तांत्रिक लोकप्रिय श्रेणी NTPC अंडरग्रेजुएट स्तर २, ३ साठी भरती होईल. या कालावधीत, रेल्वे कनिष्ठ अभियंता आणि पॅरामेडिकल श्रेणीसाठी देखील भरती केली जाईल.
रेल्वे स्तर-१(ग्रुप डी भरती) आणि मंत्री आणि पृथक श्रेणीची भरती ऑक्टोबर-डिसेंबर महिन्यात होणार आहे. मागील रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये सुमारे १.२५ कोटी तरुणांनी अर्ज केले होते.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले होते की, आता दरवर्षी रेल्वे भरती घेतली जाणार आहे. असिस्टंट लोको पायलटची भरती जानेवारीमध्ये, टेक्निशियनची भरती एप्रिलमध्ये, NTPC भरती जूनमध्ये आणि लेव्हल-१ भरती ऑक्टोबरमध्ये होणार आहे. एप्रिलमध्ये निवडणुकीची आचारसंहिता लागू नये म्हणून यंदा तंत्रज्ञांची भरती फेब्रुवारीमध्ये केली जाईल, असे त्यांनी सांगितले होते.
रिक्त पदांच्या संख्येत कपात करण्याच्या मुद्द्यावर ते म्हणाले होते की, आता चार-पाच वर्षांतून एकदा रिक्त पदे भरली जाणार आहेत. दर चार ते पाच वर्षांनी ही भरती आली तर अनेक उमेदवारांचे वयोमार्यादा उलटून या प्रकारियेतून ते बाहेर पडू शकतात. त्यामुळे हा निर्णय घेतण्यात आला आहे.
रेल्वे भर्ती बोर्डाने फेब्रुवारी महिन्यात तंत्रज्ञांच्या ९ हजार रिक्त जागांसाठी अधिसूचना जारी करण्याची घोषणा केली आहे. याशिवाय असिस्टंट लोको पायलटच्या ५६९६ पदांसाठी भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ फेब्रुवारी २०२४ आहे.
संबंधित बातम्या