RRB ALP Recruitment 2024 : रेल्वे असिस्टंट लोको पायलट पदांसाठी भरती; 'इतका' पगार मिळणार!-rrb alp recruitment 2024 railways assistant loco pilot notification soon check eligibility salary here ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  RRB ALP Recruitment 2024 : रेल्वे असिस्टंट लोको पायलट पदांसाठी भरती; 'इतका' पगार मिळणार!

RRB ALP Recruitment 2024 : रेल्वे असिस्टंट लोको पायलट पदांसाठी भरती; 'इतका' पगार मिळणार!

Jan 19, 2024 12:39 PM IST

Indian Railway Jobs: भारतीय रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलटच्या एकूण ५ हजार ९९६ पदांवर भरती होणार आहे.

Indian Railways
Indian Railways (MINT_PRINT)

Indian Railway Assistant Loco Pilot Recruitment: सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने असिस्टंट लोको पायलटच्या पदांसाठी अर्ज मागिवले आहेत. दरम्यान, २० जानेवारीपासून म्हणजेच उद्यापासून भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ फेब्रुवारी २०२४ आहे. त्यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. दरम्यान, भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊयात.

भारतीय रेल्वेच्या या भरती अंतर्गत असिस्टंट लोको पायलटच्या एकूण ५ हजार ९९६ पदांवर भरती होणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्‍यासाठी उमेदवारांकडे संबंधित क्षेत्रात आयटीआय किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

SAIL Recruitment: स्टील अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती सुरू

निवड प्रक्रिया

या पदासाठी उमेदवारांची तीन टप्प्यात परीक्षा होईल. प्रथम संगणक आधारीत चाचणी होईल. त्यानंतर संगणक आधारित अभियोग्यता चाचणी घेतली जाईल. अखेरच्या टप्प्यात उमेदवारांची वैद्यकीय चाचणी होणार. वैद्यकीय चाचणी उतीर्ण झाल्यानंतरच उमेदवारांची निवड केली जाईल.

वय आणि पगार

अधिसूचनेनुसार, उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ३० वर्षे निश्चित करण्यात आले आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार सवलत दिली जाईल. या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला १९ हजार ९०० रुपये वेतन दिले जाईल.

अर्ज शुल्क

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या सामान्य आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ५०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर, एससी, एसटी, माजी सैनिक, पीडब्लूडी, महिला आणि तृतीथपंथी श्रेणीतील उमेदवारांकडून २५० रुपये अर्ज शुल्क आकारला जाईल.

अर्ज कसा करायचा?

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने प्रथम भारतीय रेल्वेची अधिकृत साइट IndianRailways.gov.in वर भेट द्यावी. त्यानंतर मुख्यपृष्ठावरील रेल्वे भरती पर्यायावर क्लिक करून अर्ज करावा. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी.