राजस्थान लोकसेवा आयोगाने (RPSC) विविध विषयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक 2024 पदांच्या अर्ज मागिवले आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया २२ जानेवारीपासून सुरू झाली असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख २१ फेब्रुवारी आहे. इच्छुक उमेदवार rpsc.rajasthan.gov.in येथे अधिकृत संकेतस्थळाद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.
आरपीएससी अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक २०२४ च्या २०० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ज्यात हिंदी- ३७, इंग्रजी- २७, राज्यशास्त्र- ०५, इतिहास- ०३, समनाय संस्कृत- ३८, ३८ साहित्य- ४१, व्याकरण- ३६, धर्मशास्त्र- ०३, ज्योतिष गीत- ०२, यजुर्वेद- ०२, ज्योतिष फलित- ०१, ऋग्वेद- ०१, समनाय दर्शन- ०१, भाषा विज्ञान- ०१ आणि योग विज्ञान- ०१ यांचा समावेश आहे. या भरतीसाठी उमेदवारांचे वय २१ ते ४० वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे.
एससी/एसटी/ओबीसी/पीडब्ल्यूबीडी आणि इतर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज करताना ४०० रुपये, तर सामान्य/अनारक्षित प्रवर्गातील उमेदवारांना ६०० रुपये परीक्षा शुल्क भरावे लागेल.
संबंधित बातम्या