RPF हेड कॉन्स्टेबलची रेल्वेत गुंडगिरी! महिला प्रवाशाला लगावली थप्पड, VIDEO व्हायरल होताच नोकरीतून सस्पेंड
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  RPF हेड कॉन्स्टेबलची रेल्वेत गुंडगिरी! महिला प्रवाशाला लगावली थप्पड, VIDEO व्हायरल होताच नोकरीतून सस्पेंड

RPF हेड कॉन्स्टेबलची रेल्वेत गुंडगिरी! महिला प्रवाशाला लगावली थप्पड, VIDEO व्हायरल होताच नोकरीतून सस्पेंड

Jan 17, 2025 03:43 PM IST

Train Viral Video : या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की, हेड कॉन्स्टेबल ट्रेनच्या जनरल बोगीतून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशाच्या कानशिलात मारतो तसेच महिलेला शिवीगाळ करतो.

RPF हेड कॉन्स्टेबलची रेल्वेत गुंडगिरी..!
RPF हेड कॉन्स्टेबलची रेल्वेत गुंडगिरी..!

RPF Policeman Assault Woman : कधी-कधी आपल्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांपासूनच लोकांना असुरक्षित जाणवते. कुंपनच शेत खात असल्याचा असाच एक प्रकार राजस्थानमधील सवाई माधोपूर येथून समोर आला आहे. येथे एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या वर्दीच्या मग्रुरीत कुणाचेच न ऐकता एका महिला प्रवाशावर होत उचलला. सवाई माधोपूर RPF ठाण्यात तैनात हेड कॉन्स्टेबल ओम प्रकाश य़ांचा एका महिला प्रवाशाशी गैरवर्तन केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की, हेड कॉन्स्टेबल ट्रेनच्या जनरल बोगीतून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशाच्या कानशिलात मारतो तसेच महिलेला शिवीगाळ करतो.

हेड कॉन्स्टेबलने महिलेच्या लगावला कानशिलात -

ही घटना १४ जानेवारी रोजी घडली आहे. रणथंभौर एक्सप्रेस इंटरसिटी ट्रेनच्या जनरल कोचमध्ये चेन पुलिंग केली गेली. त्यानंतर हेड कॉन्स्टेबल ओम प्रकाश जनरल कोचमध्ये चेन ओढल्याच्या प्रकाराची माहिती घेण्यासाठी गेले. तेथे असलेल्या महिला,पुरुष आणि त्यांच्या मुलीच्या तिकीट व चेन ओढल्याच्या प्रकाराची चौकशी करताना वाद झाला. ट्रेन सुरू झाल्यानंतर महिला प्रवाशी कारवाईपासून वाचण्यासाठी हेड कॉन्स्टेबलच्या पाया पडू लागली. त्यानंतर रागात असलेल्या हेड कॉन्स्टेबलने महिलेला थप्पड मारली व ट्रेनमधून खाली उतरला.

हेड कॉन्स्टेबल सस्पेंड -

या घटनेचा व्हिडिओ तेथे उपस्थित असलेल्या दुसऱ्या प्रवाशाने बनवला व सोशल मीडियावर शेअर केला. व्हिडिओ पोस्ट करताना रेल्वे मंत्र्यांना टॅग केले. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कोटा रेल्वे विभागाने याची दखल घेत हेड कॉन्स्टेबल ओम प्रकाश यांना नोकरीतून निलंबित केले.

चेन पुलिंगवरून झाला वाद -

ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या एका पुरुष व महिला प्रवाशासोबत पोलिस कर्मचाऱ्याचा चेन पुलिंगवरून वाद झाला होता. महिला व पुरुष प्रवाशांसोबत त्यांची मुलगीही प्रवास करत होती. महिला, पुरुष आणि मुलीला जेव्हा हेड कॉन्स्टेबलने तिकीटसाठी व चेन पुलिंगचे कारण विचारले तेव्हा ते प्रवाशी घाबरले. त्यानंतर हेड कॉन्स्टेबल आणि प्रवाशांमध्ये वाद झाला. इतक्यात ट्रेन सुरू झाली त्यानंतर हेड कॉन्स्टेबल प्रवाशांना शिवीगाळ करत ट्रेनमधून खाली उतरू लागला. तेव्हा महिला प्रवाशाने कारवाईपासून वाचण्यासाठी हेड काँस्टेबलच्या पाया पडण्यासाठी त्याचे पाय धरले.

थप्पड मारून ट्रेनमधून उचरला काँस्टेबल -

ट्रेन सुरू झाली आणि महिलेने पाय पकडल्यानंतर ओम प्रकाश यांना राग अनावर झाला. त्यांनी महिलेच्या हातातून पाय सोडवण्यासाठी आणि ट्रेनमधून उतरण्य़ाच्या प्रयत्नात हेड कॉन्स्टेबलने महिला प्रवाशाला शिव्या देत एक कानशिलात लगावली व ट्रेनमधून खाली उतरला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोपी ओम प्रकाश यांना सस्पेंड करण्यात आले आहे.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर