मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News: शिक्षिकेचे दहावीच्या विद्यार्थ्यासोबतचे रोमँटिक फोटो व्हायरल, पाहून लोकांच्या भुवया उंचावल्या!

Viral News: शिक्षिकेचे दहावीच्या विद्यार्थ्यासोबतचे रोमँटिक फोटो व्हायरल, पाहून लोकांच्या भुवया उंचावल्या!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 02, 2024 03:49 PM IST

Teacher And Student Photo Goes Viral: कर्नाटकातील मुरुगमल्ला येथील सरकारी शाळेतील शिक्षिका आणि विद्यार्थ्याचे फोटो पाहून नेटकऱ्यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Viral News
Viral News

Teacher And Student Romantic Photoshoot: कर्नाटकातील मुरुगमल्ला येथील सरकारी हायस्कूलच्या महिला शिक्षिकेच्या फोटोशूटने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली. संबंधित शिक्षिकेने इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यासोबत फोटोशूट केले. या फोटोमध्ये दोघेही रोमँटिक पोज देताना दिसत आहेत, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिक्षिकेविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली.

संबंधित विद्यार्थी आणि शिक्षिकेचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. यानंतर लोक शिक्षण उपसंचालक बैलानजीनाप्पा यांनी महिला शिक्षिकेला निलंबित केले. त्यांनी या प्रकरणाचा तपास ब्लॉक एज्युकेशन अधिकारी व्ही. उमादेवी यांच्याकडे सोपवला. प्राथमिक तपासणीसाठी व्ही. उमादेवी यांनी शाळेला भेट दिली. निलंबित महिला शिक्षिकेने सांगितले की, या फोटोशूटमध्ये तिने आई आणि मुलाचे नाते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, अमित सिंह राजावत नावाच्या ट्विटर वापरकर्त्यांने शेअर केलेल्या फोटोमध्ये महिला शिक्षिका विद्यार्थ्यासोबत रोमँटिक फोटोशूट करताना दिसत आहे. यातील काही फोटोंवर लोक आक्षेप घेतला जात आहे. अमितने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, समाज म्हणून आपण कोणत्या दिशेने जात आहोत? कर्नाटकच्या मुरुगमल्ला चिक्कबल्लापूर जिल्ह्यात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यासोबत एका महिला शिक्षिकेचे फोटोशूट आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे. यानंतर विद्यार्थ्याच्या पालकांनी ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर यांच्याकडे तक्रार केली. शिक्षिकेच्या वर्तनाची चौकशी करण्याची त्यांनी मागणी केली.

सोशल मीडियावर ही पोस्ट पाहून प्रतिक्रियांचा पूर आला. काही युजर्सनी महिला शिक्षिकेवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. तर, काही जणांनी विद्यार्थ्यावरही कारवाई करण्यास सांगितले आहे. दरम्यान, एका वापरकरत्याने म्हटले आहे की, “या फोटो शूटवर गदारोळ करण्याची काहीच गरज नाही. या फोटोमध्ये असे काही वेगळे दिसत नाही. ज्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.”

WhatsApp channel

विभाग