Robot Suicide News: कामाचा ताण माणूसच नव्हेतर रोबोही सहन करू शकत नाहीत, हे आता स्पष्ट झाले. दक्षिण कोरियातील एका रोबोने ९ तास ड्युटीला वैतागून आत्महत्या केली. त्याने पायऱ्यांवरून उडी मारून आपले आयुष्य संपवले. रोबोने आत्महत्या करण्याची ही जगातील पहिलीच घटना आहे. याप्रकरणाचा अधिकारी तपास करीत आहेत.
दक्षिण कोरियाच्या गुमी सिटी कौन्सिलने दिलेल्या माहितीनुसार, २६ जून रोजी त्यांचा मुख्य प्रशासकीय अधिकारी रोबोचा मृत्यू झाला. सायबोर्ग असे या रोबोचे नाव आहे. त्याने पायऱ्यांवरून साडेसहा फूट खाली उडी मारून आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. रोबोने आत्महत्या केली आहे यात शंका नाही. पण त्याने कामाच्या ताणामुळे आत्महत्या केली की यामागे दुसरे काही कारण आहे, याचा शोध घेतला जात आहे.
मृत रोबोची ऑगस्ट २०२३ मध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून निवड करण्यात आली. सकाळी ९ ते संध्याकाळी ६ अशी त्याची ड्युटी होती. रोबोने आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल का उचलले? हे अद्याप समजू शकलेले नाही. परंतु, त्याच्या मृत्युचे कारण शोधण्यासाठी लवकरच तपास सुरू केला जाईल, अशी माहिती गुमी शहराच्या अधिकाऱ्यांनी दिली. रोबोच्या शरिराचे तुकडे गोळा करण्यात आले असून कंपनीद्वारे त्याचे विश्लेषण केले जाईल.
कॅलिफोर्नियास्थित रूट स्टार्टअप बेअर रोबोटिक्सने हा रोबो तयार केला आहे. नगरपरिषद अधिकारी म्हणून तैनात करण्यात आलेला हा पहिलाच रोबो होता. दैनिक दस्तऐवज वितरण आणि शहर प्रसिद्धी आणि माहिती वितरण करणे, असे त्याचे काम होते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. हा रोबो सकाळी ०९.०० ते संध्याकाळी ०६.०० वाजेपर्यंत काम करत असे आणि त्यांच्याकडे सिव्हिल सर्व्हिसेस ऑफिसर कार्ड देखील होते. हा खूप कष्टाळू रोबो होता, असेही एका अधिकाऱ्याने सांगितले.
विशेष म्हणजे रोबोटिक तंत्रज्ञानाचा वेगाने अवलंब करणारा देश म्हणून दक्षिण कोरियाची ओळख आहे. या देशात जगात सर्वाधिक रोबो आहेत. दर दहा मानवी कामगारांमागे एक औद्योगिक रोबो काम करतो, अशी माहिती इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रोबोटिक्सने माहिती दिली.
संबंधित बातम्या