७०० गाड्या, ४,००० कोटींचा राजवाडा, ८ प्राइव्हेट जेट अन् बरंच काही! कुबेरालाही लाजवेल अशी संपत्ती एका कुटुंबाकडं
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  ७०० गाड्या, ४,००० कोटींचा राजवाडा, ८ प्राइव्हेट जेट अन् बरंच काही! कुबेरालाही लाजवेल अशी संपत्ती एका कुटुंबाकडं

७०० गाड्या, ४,००० कोटींचा राजवाडा, ८ प्राइव्हेट जेट अन् बरंच काही! कुबेरालाही लाजवेल अशी संपत्ती एका कुटुंबाकडं

Jan 19, 2024 04:50 PM IST

dubai al nahyan royal family News : कुबेरालाही लाजवेल अशी संपत्ती दुबईतील एकाच कुटुंबाकडं असून हे जगातील सर्वात श्रीमंत कुटुंब असल्याचं मानलं जातं.

Richest Family in the World
Richest Family in the World

dubai al nahyan royal family : श्रीमंतीच्या कथा-कहाण्या आपण अनेक ऐकलेल्या असतात. त्या ऐकून आपल्याला कौतुक आणि आश्चर्य वाटतं. मग आपण मनातल्या मनात त्या श्रीमंतीची स्वप्न रंगवू लागतो. कल्पना करू लागतो. पण काही गोष्टी अशा असतात ज्या कल्पनेच्या पलीकडच्या असतात. अपवादात्मक असतात.

दुबईतील एका कुटुंबाची संपत्ती अशीच कल्पनेपलीकडची आहे. हे कुटुंब आहे संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांचं. नाह्यान हे एमबीझेड म्हणूनही ओळखले जातात. अल नाह्यान यांना १८ भाऊ आणि ११ बहिणी आहेत. त्यांच्या राजघराण्यात ९ मुलं आणि १८ नातवंडं आहेत. GQ च्या अहवालात जगातील सर्वात श्रीमंत कुटुंब म्हणून या कुटुंबाचं वर्णन करण्यात आलं आहे.

Pregnancy Job : महिलांना प्रेग्नेंट करण्याची नोकरी, १० लाख पगार? नेमका काय आहे हा प्रकार?

नाह्यानं कुटुंबाची संपत्ती कुबेराच्या खजिन्याला लाजवेल इतकी आहे. हे कुटुंब अबुधाबी इथं सोन्यानं बनवलेल्या कसर अल वतन प्रेसिडेन्शिल पॅलेसमध्ये राहतं. हा भव्य राजवाडा तब्बल ४०७८ कोटी किंमतीचा आहे. यूएमधील अनेक राजवाड्यांपैकी तो सर्वात मोठा आणि भव्य आहे. हा राजवाडा सुमारे ९४ एकरवर पसरलेला आहे. लक्षवेधी घुमट असलेल्या या राजवाड्यात ३ लाख ५० हजार स्फटिकांनी बनवलेलं एक भव्य झुंबर आणि अमूल्य ऐतिहासिक कलाकृती आहेत.

जगातील ६ टक्के तेलसाठ्यांवर मालकी

या कुटुंबाकडं जगातील ६ टक्के तेलसाठे आहेत. नाह्यान कुटुंबाकडं ८ खासगी जेट आहेत. एक प्रसिद्ध फुटबॉल क्लब देखील आहे. मँचेस्टर सिटी फुटबॉल क्लब आणि गायक रिहानाचा ब्युटी ब्रँड फेंटी ते एलॉन मस्कच्या स्पेस एक्ससह अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये भागीदारी आहे.

राष्ट्रपतींचे धाकटे भाऊ शेख हमद बिन हमदान अल नाहयान यांच्याकडे ७०० हून अधिक कार आहेत. यात ५ बुगाटी वेरॉन, लॅम्बोर्गिनी रेव्हेंटन, मर्सिडीज बेंझ सीएलके जीटीआर, फेरारी ५९९XX आणि मॅकलॅरेन एमसी १२ सह जगातील सर्वात मोठ्या एसयूव्ही कारचा समावेश आहे. 

६०० विकेट घेणाऱ्या फिरकीपटूला सोडावा लागला देश, पोटापाण्यासाठी सिडनीत टॅक्सी चालवतोय

कुटुंबाची स्वत:ची गुंतवणूक कंपनी

नाह्यान कुटुंबाची एक गुंतवणूक कंपनी सुद्धा आहे. राष्ट्राध्यक्षांचे भाऊ तहनौन बिन झायेद अल नाह्यान हे या कंपनीचे प्रमुख आहेत. या कंपनीचं मूल्य गेल्या पाच वर्षांत सुमारे २८ हजार टक्क्यांनी वाढलं आहे. या कंपनीचं सध्याचं बाजारमूल्य २३५ अब्ज डॉलर आहे. हजारो लोकांना ही कंपनी रोजगार देते. 

पॅरिस आणि लंडनमध्ये शाही मालमत्ता

दुबईच्या या राजघराण्याकडं केवळ संयुक्त अरब अमिरातीमध्येच नव्हे तर पॅरिस आणि लंडनसारख्या महागड्या शहरांमध्येही आलिशान मालमत्ता आहे. या कुटुंबाच्या पूर्वीच्या प्रमुखाला लोक 'लंडन लँडलॉर्ड' असं म्हणत. ब्रिटनच्या सर्वात पॉश भागात त्याच्या मालकीची अफाट मालमत्ता असल्यामुळं त्यांना हे टोपणनाव पडलं होतं.

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर